शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

क्रिकेट आफ्रिका

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

मिलर, ड्युमिनीची शतके : झिम्बाब्वेवर ६२ धावांनी मात

मिलर, ड्युमिनीची शतके : झिम्बाब्वेवर ६२ धावांनी मात
दक्षिण आफ्रिकेची सरशी
हॅमिल्टन : डेव्हिड मिलर व जेपी ड्युमिनी यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ६२ धावांनी पराभव केला आणि विश्वकप क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. ४ बाद ८३ अशी अवस्था असताना मिलर व ड्युमिनीच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ३३९ धावांची दमदार मजल मारली. मिलरने केवळ ९२ चेंडूंना सामोरे जाताना १३८ धावांची खेळी केली, तर ड्युमिनीने १०० चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ११५ धावा फटकाविल्या. प्रत्युत्तरात खेळताना झिम्बाब्वेने ३३ षटकांत २ बाद १९१ धावांची मजल मारत चांगली सुरुवात केली. हॅमिल्टन मसाकाजा (८०) व चामू चिभाभा (६४) यांनी अर्धशतके झळकावीत झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. पण त्यानंतर ८६ धावांच्या मोबदल्यात अखेरच्या ८ विकेट गमावल्यामुळे झिम्बाब्वेला पराभव स्वीकारावा लागला. झिम्बाब्वेचा डाव ४८.५ षटकांत २७७ धावांत संपुष्टात आला. मसाकाजाने ७४ चेंडूंच्या खेळीमध्ये ८ चौकार व २ षटकार लगावले. चिभाभाने ८२ चेंडूंच्या खेळीत १० चौकार ठोकले. ब्रेन्डन टेलरने ४० आणि सोलोमन मिरेने २७ धावांच्या योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पहिल्या ५ षटकांत ३८ धावा बहाल केल्या. त्याने ९ षटकांत एकूण ६४ धावा दिल्या. लेग स्पिनर इम्रान ताहिरने १० षटकांत ३६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर वेर्नोन फिलँडर व मोर्नी मोर्कलने प्रत्येकी २ बळी घेतले.
त्याआधी, १९९९ च्या विश्वकप स्पर्धेप्रमाणे यावेळीही दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागेल, असे चित्र होते. फॉर्मात असलेला कर्णधार एबी डिविलियर्ससह (२५) दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले त्यावेळी धावफलकावर केवळ ८३ धावांची नोंद होती. मिलर व ड्युमिनी यांनी त्यानंतर पाचव्या विकेटसाठी २५६ धावांची विक्रमी भागीदारी करीत डाव सावरला. यापूर्वीचा विक्रम इंग्लंडचा इयोन मोर्गन व रवी बोपारा यांच्या नावावर होता. दोन वर्षांपूर्वी मोर्गन व बोपारा यांनी आयर्लंडविरुद्ध डब्लिनमध्ये २२६ धावांची भागीदारी केली होती.