शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सानियाच्या ‘खेलरत्न’ला न्यायालयाची स्थगिती

By admin | Updated: August 28, 2015 14:22 IST

देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला ‘राजीव गांधी खेलरत्न’ यंदादेखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. पॅरालिम्पियन एच. एन. गिरीशा याच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने

बंगळुरू : देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेला ‘राजीव गांधी खेलरत्न’ यंदादेखील वादाच्या भोवऱ्यात अडकला. पॅरालिम्पियन एच. एन. गिरीशा याच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला यंदा मिळणाऱ्या या पुरस्काराला बुधवारी स्थगिती दिली.गेल्या वर्षी पुरस्कार निवड समितीने या पुरस्कारासाठी कुणालाही योग्य मानले नव्हते. यंदा अखेरच्या क्षणी विश्व दुहेरी टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सानियाच्या नावाची शिफारस करण्यात आली. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेदेखील तिच्या नावावर मोहोर उमटवली. सानियाला राष्ट्रीय क्रीडादिनी २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात या पुरस्काराने गौरविण्यात येणार होते; पण आता कर्नाटक हायकोर्टाच्या स्थगितीमुळे पुरस्कार वादात अडकला. २०१२च्या लंडन पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत गिरीशाने रौप्यपदक जिंकल्यानंतर २०१४च्या इंचियोन एशियाडमध्येही कांस्य जिंकले. त्याने कोर्टात याचिका दाखल करून या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी आपल्याला डावलण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सानियाला सन्मानित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देऊन त्याने परिस्थितीत गांभीर्य आणले. राष्ट्रपती भवनात २९ आॅगस्ट रोजी आयोजित सोहळ्याला आता केवळ ३ दिवस उरले असून, सानिया हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमेरिकेतून नवी दिल्लीत दाखल होत असल्याची चर्चा होती; पण प्रकरण कायदेशीर वादात अडकले. कोर्टाने बुधवारी गिरीशाची याचिका स्वीकारली; शिवाय मंत्रालयाला निर्णयाचा फेरआढावा घेण्यास सांगितले. दुसरीकडे, सानिया या पुरस्कारापासून वंचित राहिल्यास दुहेरीतील नंंबर वन खेळाडू आणि विम्बल्डन चॅम्पियन असलेल्या या खेळाडूसोबत हे निराशादायी ठरेल. (वृत्तसंस्था) मी या पुरस्काराचा खरा हक्कदार आहे. मंत्रालयाने गुणपद्धती लक्षात घेतल्यास ९० गुणांसह मी सर्वांत आघाडीवर आहे. सानिया माझ्या गुणांच्या जवळपासही नाही. सानियाने दुहेरीत ग्रँडस्लॅम जिंकले हे खरे आहे; पण २०११पासून आॅलिम्पिक, पॅरालिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा आणि विश्व चॅम्पियनशिप यांमधील कामगिरी ‘खेलरत्न’साठी विचारात घेतली जाते, हेदेखील सत्य आहे.- एच. एन. गिरीशा,पॅराअ‍ॅथलिट.