रीसिफे : दहा खेळाडूंसह खेळणा:या कोस्टारिकाने ग्रीसचा पेनल्टी शूअटआउटर्पयत रंगतदार ठरलेल्या लढतीत 5-3 ने पराभव करीत फिफा विश्वचषकाची प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. ब्रायन रुईज या सामन्याचा हिरो ठरला. त्याने निर्धारित वेळेत गोल नोंदवून कोस्टारिकाला आघाडी मिळवून दिलीच पण पेनल्टी शूटआऊटमध्येही दमदार गोल केला.
निर्धारित वेळेत उभय संघ 1-1 ने बरोबरीत होते. ग्रीसकडून इन्जुरी टाईममध्ये सोकराटिस पापास्ताथेपोलस याने गोल नोंदवून सामना बरोबरीत सोडविला होता. यानंतर अतिरिक्त वेळेतही उभय संघ गोल नोंदवू शकले नव्हते. निकालाची कोंडी फोडण्यासाठी अखेर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब झाला. फेनिस गोकासने ग्रीसकडून मारलेली चौथी पेनल्टी व्यर्थ गेली तर मायकेल उमाना याने कोस्टारिकाकडून पाचवी पेनल्टी गोलजाळ्यात मारताच संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
नियमित वेळेत कोस्टारिकाने पहिला गोल 52 व्या मिनिटाला नोंदविला. ािस्तियन बोनोलोस याने पेनल्टी एरियात उभा असलेला रुईजकडे पास देतान कर्णधार रुईजने चेंडू गोलजाळीत ढकलला. याआधी हेडरद्वारे गोल नोंदवून इटलीला स्पर्धेबाहेर ढकलणा:या रुईजच्या शॉटमध्ये काल ताकद नव्हती पण ग्रीसचा गोलकिपर ओरेस्टिस कार्नेजिस तसेच बचावफळीतील त्यांच्या सहका:यांनी रुईजचा गोल थोपविण्यासाठी प्रय}च केले नाहीत.
या गोलमुळे ग्रीसचे खेळाडू खडबडून जागे झाले. त्यांनी कोस्टारिकावर दबाव आणण्याचा प्रय} केला. कोस्टारिकाचा खेळाडू ऑस्कर दुराते याने 62 व्या मिनिटाला ज्योस होलेबॉस याला खाली पाडले. त्यावर त्याला दुसरे यलो कार्ड मिळताच मैदान सोडावे लागले. ग्रीसने हल्ल्यांमध्ये आणखी जलदपणा आणला तर कोस्टारिकाला देखील विजय आपल्याच बाजूने असल्याचा भास झाला. त्यांनी प्रतिस्पर्धी संघाची आक्रमक फळी थोपवून धरण्याचा पूरेपूर प्रय} केला. पण पापास्ताथेपोलस याने इन्जुरी टाईममधील दुस:या मिनिटाला गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. गेकासने हा शॉट मारला. त्यावर नेवास नियंत्रण मिळवू न शकल्याने चेंडू रिबाऊंड झाला. पापास्ताथेपोलसने संधी साधून लगेच गोल नोंदविला. (वृत्तसंस्था)
कोस्टारिका
4सेल्सो बोर्गेस : गोल
4ब्रायन रुईज : गोल
4जियानकालरे गोंजालेज : गोल
4जोएल कॅम्पबेल : गोल
4उमाना : गोल
ग्रीस
4कॉन्सिटॅनटिनोस मिट्रोगलो : गोल
4लाजरोस क्रिस्टांडोपोलोस : गोल
4जोस होलेबास : गोल
4के. नाव्हास : गोलरक्षकाने अडविला
4पाचवी पेनल्टीची संधी घेतलीच नाही