रेसीफे: कोस्टा रिकाने सनसनाटी खेळाच्या बळावर शुक्रवारी ‘ड’ गटाच्या सामन्यात चार वेळचा चॅम्पियन इटलीला 1-क् ने नमविताच इंग्लंडला फिफा विश्वचषकाबाहेर व्हावे लागले. कोस्टा रिकाने या विजयासह अंतिम 16 संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
1958 नंतर विश्वचषकातून पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की इंग्लंडवर प्रथमच ओढवली आहे. दुसरीकडे विजयानंतर कोस्टा रिकाने 24 वर्षानंतर पहिल्यांदा उपउपांत्य फेरीत धडक दिली. विश्व क्रमवारीत 28 व्या स्थानावर असलेल्या कोस्टा रिकाने पहिल्या सामन्यात माजी विजेत्या ऊरुग्वेचा 3-1 ने पराभव केला. सलग दुस:या विजयानंतर कोस्टा रिकाचे सहा गुण झाले. इटलीने इंग्लंडवर 2-1 ने विजय साजरा केला होता, पण दुस:या सामन्यात पराभव पत्करावा लागला. कोस्टा रिकाचा बचावफळीतील खेळाडू ज्युनिअर दिएज याने 44 व्या मिनिटाला दिलेल्या पासवर स्ट्राइकर रुईजने गोलजाळीच्या दिशेने हेडर मारला. इटलीचा गोलकीपर आणि कर्णधार गियानलुईगी बफॉन हा हेडर थोपवून लावण्यात अपयशी ठरताच कोस्टा रिकाचे खाते उघडले. चेंडू गोलपोस्टच्या लाइनच्या आत धडकला, हे लक्षात येताच रेफ्रीने गोल घोषित केला. मध्यांतरार्पयतच्या खेळात कोस्टा रिका 1-क् ने आघाडीवर होता. त्याआधी इटलीचा फॉरवर्ड मारियो बॅलोटेली याने दोनदा गोल नोंदविण्याची संधी गमावली. (वृत्तसंस्था)
गेल्या तीन विश्वचषक
स्पर्धात इटलीला साखळी गटातील दुसरी लढत एकदाही जिंकता आलेली नाही.