शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ऑलिम्पिकची नव्याने तयारी करू, डावपेचही आखू; आयओसीच्या निर्णयाचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:28 IST

coronavirus : आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रकोपामुळे टोकियो आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्याच्या आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीच्या निर्णयाचे भारतीय आॅलिम्पिक संघटनेने स्वागत केले. दुसरीकडे स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे अनेक खेळाडूंच्या करिअरवर विपरीत परिणाम होईल, अशी कबुलीदेखील दिली. असे असले तरी आॅलिम्पिकची नव्याने तयारी करण्याचा तसेच डावपेच आखण्याचा निर्धार आयओए तसेच क्रीडा मंत्रालयाने व्यक्त केला आहे.आयओए महासचिव राजीव मेहता यांनी टोकियो आॅलिम्पिक आयोजन समितीला लिहिलेल्या पत्रात आॅलिम्पिक वर्षभर स्थगित करण्यात आल्यामुळे काही खेळाडूंच्या करिअरवर तसेच पात्रता गाठण्याच्या योजनेवर विपरीत परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली आहे. आम्ही सर्वजण त्यांची आवश्यक मदत करणार असून भारतातील लॉक डाऊन संपल्यानंतर सर्वच महासंघांसोबत चर्चा करण्यात येईल, असे सांगून खेळाडूंची सुरक्षा सर्वतोपरी असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.दरम्यान, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानेदेखील आॅलिम्पिकसाठी नव्याने तयारी करण्याचे आणि संशोधित योजना आखण्याचे संकेत दिले आहेत. (वृत्तसंस्था)पॅरालिम्पिक समितीनेही केले स्वागतनवी दिल्ली : भारतीय पॅरालिम्पिक समितीने टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे तयारीबाबत द्धिधा मन:स्थितीत असलेल्या खेळाडूंना दिलासा लाभेल, असे म्हटले आहे. पीसीआय महासचिव गुरुशरणसिंग यांनी लॉकडाऊन संपल्यानंतर पीसीआय पुढील डावपेच आखेल, असे म्हटले आहे. अध्यक्ष दीपा मलिक यांनी याआधी खेळाडूंच्या आरोग्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे म्हटले होते.‘कोरोनाच्या जागतिक संकटामुळे टोकियो २०२० आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभर पुढे ढकलण्याच्या आयओसीच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जगभरातील खेळाडूंच्या हितासाठी हा निर्णय आवश्यक होता. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सर्वच भारतीय खेळाडूंना यथायोग्य मदत करण्याचे मी आश्वासन देत आहे. सद्यस्थितीचा त्यांच्या तयारीवर परिणाम होणार नाही, याची ग्वाही देतो. खेळाडूंनी निराश होऊ नये. आम्ही याहून सर्वोत्कृष्ट तयारी करू आणि योजना आखू. भारत २०२१ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल.’-किरेन रिजिजू, क्रीडामंत्री

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020corona virusकोरोना वायरस बातम्या