शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विराटने आक्रमक शैली कायम राखावी : द्रविड

By admin | Updated: August 2, 2015 01:31 IST

कसोटी कर्णधार म्हणून श्रीलंकेत प्रथमच पूर्ण मालिका खेळण्यासाठी जात असलेला विराट कोहली यशस्वी ठरेल, असा विश्वास भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केला.

चेन्नई : कसोटी कर्णधार म्हणून श्रीलंकेत प्रथमच पूर्ण मालिका खेळण्यासाठी जात असलेला विराट कोहली यशस्वी ठरेल, असा विश्वास भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केला. कोहलीने आपली आक्रमक शैली कायम राखायला हवी, असा सल्ला द्रविडने या वेळी दिला. कोहलीच्या मैदानावरील वर्तनाबाबत बोलताना द्रविड म्हणाला, ‘‘माझ्या मते, प्रत्येकाने आपला स्वभाव कायम राखायला हवा. वेगवेगळे वर्तन असलेले लोक या खेळामध्ये यशस्वी ठरतात, ही या खेळाची विशेषता आहे. अनेक आक्रमक क्रिकेटपटू यशस्वी ठरतात. काही अधिक आक्रमक असतात, तर काही त्या तुलनेत कमी आक्रमक असतात.’’ कोहलीने भारत ‘अ’ संघातर्फे दुसरा सराव सामना खेळला. त्यामुळे द्रविडला त्याच्यासोबत प्रदीर्घ चर्चा करण्याची संधी मिळाली. श्रीलंका दौऱ्यात कोहलीकडून असलेल्या अपेक्षांबाबत बोलताना द्रविड म्हणाला, ‘‘माझ्या मते, हा दौरा महत्त्वाचा आहे, पण त्याला अधिक महत्त्वपूर्ण बनवण्याची गरज नाही. प्रत्येक आंतरराष्ट्रीय दौरा महत्त्वाचा असतो. या दौऱ्यात त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे सहकाऱ्यांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची जबाबदारी त्याची आहे. अनेकदा बाबी अनुकूल असतात तर अनेकदा प्रतिकूलही असतात. तो मेहनती असून, त्याने या सामन्यात सहभाग नोंदवला, ही चांगली बाब आहे. हा अनुभव त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल.’’चेतेश्वर पुजारा व कोहलीसोबत काय चर्चा झाली, याबाबत मात्र द्रविडने स्पष्ट केले नाही. सराव सामन्यात आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने भारत ‘अ’ संघावर वर्चस्व गाजवले असले तरी बेंच स्ट्रेंथबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे द्रविड म्हणाला. प्रत्येक सामन्यात उतार-चढाव अनुभवायला मिळतात. भारतीय संघात काही प्रतिभावान खेळाडू आहेत. सामन्याच्या निकालावरून त्यांच्या कामगिरीचे आकलन करता येणार नाही. ‘अ’ संघाने मालिका जिंकली किंवा हरली, ही महत्त्वाची बाब नसून आमचे लक्ष्य आंतरराष्ट्रीय पातळीसाठी खेळाडूंना सज्ज करण्याचे आहे, असेही द्रविडने या वेळी सांगितले. (वृत्तसंस्था)