शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोंटाची दिमाखात उपांत्य फेरीत

By admin | Updated: July 12, 2017 00:39 IST

ब्रिटनच्या जोनाथन कोंटाने अनपेक्षित विजयाची नोंद करताना द्वितीय मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला धक्का देत पहिल्यांदा विम्ब्लडनच्या उपांत्य फेरीत धडक मारली

लंडन : ब्रिटनच्या जोनाथन कोंटाने अनपेक्षित विजयाची नोंद करताना द्वितीय मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला धक्का देत पहिल्यांदा विम्ब्लडनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना कोंटाने ६-७ (२-७), ७-६ (७-५), ६-४ अशी बाजी मारली.दरम्यान आता उपांत्य फेरीत कोंटापुढे बलाढ्य व्हिनस विलियम्सचे तगडे आव्हान असेल. सध्या व्हिनसचा फॉर्म पाहता कोंटाला उपांत्य फेरीत विजय मिळवणे अत्यंत अवघड जाईल. हालेपने सामन्यात आश्वासक सुरुवात करताना पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होतली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये कोंटाने दमदार पुनरागमन करताना टायब्रेकमध्ये बाजी मारत सामना बरोबरीत आणला. यानंतर तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये आक्रमक खेळ करताना कोंटाने हालेपचे आव्हान मोडून काढत दिमाखात उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरीत खांद्याच्या दुखापतीमुळे संघर्ष करावा लागल्यानंतर नोव्हाक जोकोव्हीचने फ्रान्सच्या एड्रियन मानेरिनोचा पराभव करीत नवव्यांदा या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.गेल्या काही दिवसांपासून कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या दुसऱ्या मानांकित जोकोव्हीचने मानेरिनोचा ६-२, ७-६, ६-४ ने पराभव केला. या लढतीदरम्यान तिसऱ्या सेटच्या पाचव्या गेमच्या वेळी त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. खांद्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी ४-३ असा स्कोअर असताना त्याला वैद्यकीय टाइमआऊटचा आधार घ्यावा लागला. पहिल्या सेटच्या सुरुवातीच्या तीन गेम्सनंतरही त्याने वैद्यकीय मदत घेतली होती. ही लढती सुरुवातीला सोमवारी खेळली जाणार होती, पण अन्य लढती लांबल्यामुळे आयोजकांनी ही लढत आज खेळविण्याचा निर्णय घेतला. जोकोव्हीचला उपांत्यपूर्व फेरीत चेक प्रजासत्तकाच्या टॉमस बर्डीचच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ११ व्या मानांकित बर्डीचने सोमवारी चौथ्या फेरीच्या लढतीत आठव्या मानांकित डोमिनिक थिएमचा ६-३, ६-७, ६-३, ३-६, ६-३ ने पराभव केला. जोकोव्हीच व बर्डीच यांच्यादरम्यान आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत त्यात सर्बियन खेळाडू जोकोव्हीचने २५ सामने जिंकले आहेत. (वृत्तसंस्था)