शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चंदीगड, बंगालचे विजय

By admin | Updated: March 15, 2017 01:15 IST

चंदीगडने मेघालयवर २-०ने तर पश्चिम बंगालने सेनादलवर एकमेव गोलने विजय मिळवत प्रतिष्ठेच्या संतोष चषक फु टबॉल स्पर्धेत आगेकूच केली. पश्चिम बंगालचा हा दुसरा विजय ठरला.

वास्को : चंदीगडने मेघालयवर २-०ने तर पश्चिम बंगालने सेनादलवर एकमेव गोलने विजय मिळवत प्रतिष्ठेच्या संतोष चषक फु टबॉल स्पर्धेत आगेकूच केली. पश्चिम बंगालचा हा दुसरा विजय ठरला. येथील टिळक मैदानावर झालेल्या सामन्याच्या पूर्वाधात सुरुवातीला मेघालयाने आक्रमक खेळ केला. आठव्या मिनिटाला मेघालयच्या इनेस्टरच्या चालीवर पाले याचा शूट चंडीगडचा गोलरक्षक हरपीतपल सिंगने परतावून लावला. त्यानंतर ३५व्या मिनिटाला चंदीगडलाही चांगली संधी प्राप्त झाली होती़ या वेळी हर्षदीप सिंगने दिलेल्या क्रॉसवर अमनदीप सिंगचा हेडर दिशाहिन ठरला, त्यामुळे त्यांची संधी हुकली. या सत्रातील ५१व्या मिनिटाला आघाडीचा गोल कितबोव्कांग पाले याने नोंदवला. या आघाडीमुळे मेघालयच्या गोटात आनंद पसरला होता. ६५व्या मिनिटाला जर्मनजीत सिंगने हेडरवर गंगादीप सिंगकडे चेंडू सोपविला. त्याने ही संधी साधत ‘रिबॉण्ड’वर गोल नोंदवला आणि चंडीगडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर लगेच चंदीगडला आघाडी घेण्याची संधी लाभली होती़ ६६ व्या मिनिटाला बदली खेळाडू अभिषेक शर्माचा शूट गोल पोस्टवरून बाहेर गेला. ८२ व्या मिनिटाला मेघालयचा बदली खेळाडू बिकीसन खारकोंगुरच्या चालीवर इनेस्टर याचा शूट गोलरक्षकने दूर केला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत (९१वे मिनिट) चंदीगडच्या अमरदीप सिंगने दिलेल्या चालीवर कर्णधार शिजपाल सिंगने मेघालयच्या दोन बचावपटूंना भेदत शानदार गोल नोंदवला आणि संघाला विजयश्री मिळवून दिला.