ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 4- आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा सदिच्छा दूत म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरने प्रस्ताव स्वीकारल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने तेंडुलकरचे अभिनंदन करुन त्याला शुभेच्छा दिल्या. गांगुलीने बुधवारी याबाबतीत सांगितले की, ‘‘भारतीय संघाचा सदिच्छा दूत म्हणून निवड झाल्याबद्दल मी सचिनचे अभिनंदन करतो. ज्याप्रकारे अभिनव बिंद्राने भारतासाठी खूप काही केले आहे, त्याचप्रमाणे सचिननेही भारतासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. यामुळेच भारतीय ओलिम्पिक महासंघने (आयओए) सचिनची सदिच्छा दूत म्हणून निवड केली.’’बॉलिवूड स्टार सलमान खान आणि आॅलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांच्यानंतर सचिन आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा सदिच्छा दूत बनणार आहे. (वृत्तसंस्था)
दादाने केले सचिनचे अभिनंदन
By admin | Updated: May 4, 2016 21:10 IST