शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

क्रिकेटपटूंचे संमिश्र यश

By admin | Updated: June 19, 2015 02:10 IST

बुधवारी पार पडलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये एका बाजूला राजकीय व्यक्तींनी बाजी मारलेली

मुंबई : बुधवारी पार पडलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये एका बाजूला राजकीय व्यक्तींनी बाजी मारलेली दिसत असताना दुसऱ्या बाजूला क्रिकेटपटूंना मात्र संमिश्र यश मिळाल्याचे दिसून आले. दिलीप वेंगसरकर आणि प्रवीण आमरे या माजी क्रिकेटपटूंचा अपवाद वगळता या निवडणूकीमध्ये उभे असलेल्या इतर क्रिकेटपटूंना पराभवाचे तोंड पाहावे लागले.विशेष म्हणजे, अध्यक्षपदी निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (१७६) यांच्या पवार - म्हाडदळकर गटाचे उपाध्यक्षपदी निवड झालेल्या दिलीप वेंगसरकर (१९५) यांनी पवार यांच्याहून अधिक मते मिळवताना बाजी मारली. त्याचवेळी कार्यकारिणी सदस्यपदासाठी निवड झालेले माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी १७० मते मिळवली. आमरे यांच्या रुपाने डॉ. विजय पाटील यांच्या ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाचा एकमेव उमेदवार कार्यकारीणी सदस्यपदी निवडणून आला.उपाध्यक्षपदी व सह-सचिवपदी निवडणूक लढवलेले क्रिकेट फर्स्ट गटाचे उमेदवार अनुक्रमे अ‍ॅबी कुरविल्ला व लालचंद राजपूत या दोन्ही माजी क्रिकेटपटूंचा पराभव झाला. चार वर्षांपूर्वी विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये वेंगसरकर यांचा पराभव झाला होता. यंदा त्यांनी पवारांच्या गटातून उपाध्यक्षपदी निवडणूक लढवताना दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मते मिळवली. कार्यकारिणी सदस्यपदावर निवड झालेले अरमान मलिक यांना सर्वाधिक २०५ मते पडली.दुसऱ्या बाजूला पराभूत क्रिकेट फर्स्टच्या गटातून प्रवीण आमरे या एकमेव माजी क्रिकेटपटूची निवड झाली. तर मुंबईचे माजी फिरकीपटू संजय पाटील यांना देखील पराभवास सामोरे जावे लागले. क्रिकेट क्लब आॅफ इंडियाचे (सीसीआय) माजी फिरकीपटू मयांक खांडवाला यांना खजिनदारपदासाठी नितीन दलाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. एकूणच ही निवडणूक क्रिकेटपटूंसाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’ अशीच ठरली. दोघांचा विजयपवार - म्हाडदळकर गटातून दिलीप वेंगसरकर आणि क्रिकेट फर्स्ट गटातून प्रवीण आमरे या माजी क्रिकेटपटूंनीच केवळ बाजी मारली. इतर नावाजलेल्या माजी क्रिकेटपटूंपैकी अन्य कोणालाही विशेष छाप पाडता आली नाही.