शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा, खिलाडूवृत्तीचा अनोखा मेळ

By admin | Updated: February 16, 2015 01:51 IST

स्टेडियमच्या मार्गावर असताना ‘स्वामी आर्मी’च्या नेतृत्वाखाली जवळजवळ पाच हजार भारतीय चाहत्यांचा मार्च पास्ट बघितल्यानंतर आनंद झाला.

आॅस्ट्रेलिया येथून ,आशीष जैन -स्टेडियमच्या मार्गावर असताना ‘स्वामी आर्मी’च्या नेतृत्वाखाली जवळजवळ पाच हजार भारतीय चाहत्यांचा मार्च पास्ट बघितल्यानंतर आनंद झाला. हा मार्च पास्ट अल्डर्स पार्कपासून अ‍ॅडिलेड ओव्हल स्टेडियमपर्यंत होता. आम्हीही त्या मार्च पास्टमध्ये सामील झालो. त्यात सर्वंच वयोगटातील भारतीय पुरुष व महिलांचा समावेश होता. या मार्च पास्टमध्ये सहभागी चाहते ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करीत टीम इंडियाचे मनोधैर्य उंचावत होते. गर्दीतून मार्ग काढत आम्ही स्टेडियममध्ये प्रवेश केला. मैदान व्यवस्थापन समितीने चांगली व्यवस्था केली होती. स्वयंसेवक दर्जेदार भोजन व शीतपेय उपलब्ध करून देत होते. ज्या स्टँडमध्ये आमचे आसन होते त्या स्टँडमध्ये भारत व पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लढतीचा आनंद घेण्यासाठी उभय देशांचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे आले होते. खेळाप्रति असलेला ‘जुनून’ आणि काही घटना हृदयाला भिडणाऱ्या होत्या. राष्ट्रगीत सुरू असताना उभय देशांच्या चाहत्यांनी उभे राहून विश्वबंधुत्वाची प्रचिती दिली. लढत सुरू झाली. उभय संघांदरम्यान मैदानावर चुरस दिसून येत असली तरी स्टँडमध्ये उपस्थित चाहते मात्र खिलाडूवृत्तीचा परिचय देत होते. पाच वर्षांचा चाहता असो किंवा ८० वर्षांचे आजोबा असो, त्यांच्या मुखात ‘जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ हेच नारे होते. उभय देशांचे चाहते राष्ट्रप्रेम व्यक्त करीत होते. प्रत्येक चाहत्याला त्याचा संघ जिंकावा असे वाटत होते, पण लढत रंगतदार होईल, यात मात्र कुणाचे दुमत नव्हते. भारतीय संघाने चमकदार कामगिरी करीत विजय मिळविला, पण शेवटी विजय हा क्रिकेटचा झाला.