शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

प्ले आॅफच्या चौथ्या स्थानासाठी स्पर्धा

By admin | Updated: May 3, 2017 00:36 IST

आयपीएलचे दहावे पर्व संपण्यास जवळपास १९ दिवस शिल्लक राहिले आहेत आणि प्ले आॅफमध्ये कोणते संघ जाणार, हे आता जवळपास

 - अयाझ मेमन -आयपीएलचे दहावे पर्व संपण्यास जवळपास १९ दिवस शिल्लक राहिले आहेत आणि प्ले आॅफमध्ये कोणते संघ जाणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यातही तीन संघ असे आहेत ज्यांच्या प्ले आॅफ प्रवेशाबाबत मला खात्री आहे. एक म्हणजे मुंबई इंडियन्स, हा संघ आधीच प्ले आॅफमध्ये पोहोचला आहे. वानखेडेवर आरसीबीला नमवून १६ गुणांसह त्यांनी दिमाखात आगेकूच केली. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स खूप मजबूत संघ दिसत आहे. त्यासोबत सनरायझर्स हैदराबादही लक्षवेधी ठरले आहेत. हे तीन संघ असे आहेत, ज्यांचे आणखीन सामने बाकी आहेत आणि अजून गुण मिळवण्याची त्यांना संधी आहे. परंतु, प्ले आॅफमध्ये पोहचणारा चौथा संघ कोणता असेल, हा मोठा प्रश्न आहे. कारण रायझिंग पुणे सुपरजायंट हा सुरुवातीला खूप कमजोर दिसत होता. पण, त्यांनी नंतर जबरदस्त  सातत्य राखताना गुणतालिकेत झपाट्याने आगेकूच केली. तसेच  त्यांचे प्रमुख खेळाडूही फॉर्ममध्ये  आले आहेत. त्याचप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाब हा संघही उशीरा का होईना, पण चांगल्या फॉर्ममध्ये आला आहे. त्यामुळे या संघांमध्ये चौथ्या स्थानासाठी स्पर्धा असेल. तळाला असलेले आरसीबी, दिल्ली आणि गुजरात या संघासाठी जवळपास ही स्पर्धा संपल्यात जमा आहे. तरी आयपीएलमध्ये हे सांगणे कठीण आहे, की कोणता संघ जिंकेल.  तसेच, माझ्या मते हा आयपीएलचा पहिला असा मोसम आहे ज्यात जवळपास दोन आठवड्यांपूर्वीच प्ले आॅफमधील  पहिले तीन संघ कोणते असतील, ते कळाले आहे. याआधी असे कधी झाले नाही आणि ती उत्सुकता अखेरपर्यंत कायम असायची. त्यामुळे असे म्हणायला हरकत नाही की तळाचे संघ खूप कमजोर ठरले. संघ समतोल नव्हता, खेळाडूंच्या  दुखापती किंवा खेळाडूंची निराशाजनक कामगिरी, हे यामागचे कारण असू  शकेल.आरसीबी संघाचेच उदाहरण घ्या. मागच्या वर्षी हा संघ अंतिम सामन्यात खेळला. यावर्षीही हा संघ मजबूतीने खेळेल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, सुरुवातीपासूनच हा संघ दुखापतींना सामोरा गेला. मिशेल स्टार्क दुखापतीमुळे आलाच नाही. विराट कोहली एक आठवडा खेळला नाही, एबी डिव्हिलियर्सही दुखापतग्रस्त होता. हा संघ माझ्यामते गेल, डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीवर अधिक अवलंबून होता. तिघांनीही काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत, पण एकत्रितपणे त्यांची कमगिरी खराब झाली आहे.  केएल राहुलही नसल्याने त्यांची फलंदाजी काहीशी कमाजोर पडली. तसेच, दिल्ली संघाची फलंदाजी मजबूत आहे, परंतु जे युवा खेळाडू आहेत, ते दबावाला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकले नाहीत. गोलंदाजीदेखील चांगली आहे. अनुभवी झहीर खानने चांगल्या गोलंदाजीसह चांगले नेतृत्त्व केले. मात्र त्यांना छाप पाडण्यात अपयश आले.गुजरात लायन्स आपल्या फलंदाजांवर अधिकपणे अवलंबून होते. त्यांची फलंदाजी जबरदस्त तगडी आहे. मॅक्क्युलम, अ‍ॅरोन फिंच, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, रवींद्र जडेजा अशी फौज त्यांच्याकडे आहे. परंतु, जर तुमच्याकडे गोलंदाज नसतील तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही बाद कसे करणार? त्यामुळे हे तीन संघ अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे पुणे संघासाठी त्यांचा प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स निर्णायक ठरणार आहे. गुजरातविरुद्ध  तो ज्या पद्धतीने खेळला तो खेळ  त्याने कायम राखला तर हा संघ खूप मजबूत होईल. सुरुवातीला पुण्याची गोलंदाजीही कमजोर दिसत होती, पण नंतर त्यांचे प्रमुख खेळाडू हळूहळू फॉर्ममध्ये आले आहेत. त्यामुळे प्ले आॅफमधील चौथ्या स्थानासाठी पुणे संघ मोठा दावेदार आहे.