शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : भारोत्तोलनात भारताचा ‘सुवर्ण’चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 05:50 IST

असह्य वेदनांची पर्वा न करता फिजिओथेरपिस्टअभावी भारतीय भारोत्तोलकांनी २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई करीत या खेळात पदकतालिकेत चार सुवर्णांची लयलूट केली.

गोल्ड कोस्ट : असह्य वेदनांची पर्वा न करता फिजिओथेरपिस्टअभावी भारतीय भारोत्तोलकांनी २१ व्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई करीत या खेळात पदकतालिकेत चार सुवर्णांची लयलूट केली. दुसरीकडे बॅडमिंटनपटू आणि बॉक्सर्सची विजयी घोडदौड सुरूच असून भारतीय पुरुष हॉकी संघाने मात्र निराशा केली. शनिवारी पाकिस्तानविरुद्धचा सलामीचा हॉकी सामना २-२ असा बरोबरीत सुटला.चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. आॅस्ट्रेलिया २० सुवर्ण, १७ रौप्य आणि २० कांस्यपदकांसह अव्वल स्थानावर आहे. भारोत्तोलक सतीश शिवलिंगमने ७७ किलो आणि राहुलने ८५ किलो गटात सुवर्ण जिंकले. दोघेही पूर्णपणे फिट नव्हते. जांघेत आणि गुडघ्यात विव्हळणारे दुखणे असताना दोघांनी सोनेरी यश संपादन केले हे विशेष.पहिल्या दोन दिवसांमध्ये भारताच्या भारोत्तोलकांनी दमदार कामगिरी केल्यानंतर तिसरा दिवस गाजविला तो सतीशने. भारताच्या खात्यात तीन सुवर्ण, दोन कांस्य अशी पाच पदके झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पाचही पदके वेटलिफ्टिंग प्रकारात मिळालेली आहेत. गुरुराजा, मीराबाई चानू, संजिता चानू आणि दीपक लाथेर यांनी याआधी पदकांची कमाई केली आहे. सतीशने एकूण ३७७ किलो (१४४ आणि १७३) वजन उचलताच अखेरच्या प्रयत्नांत त्याला पोडियमवरदेखील जावे लागले नाही. तमिळनाडूचा सतीश आणि रौप्यविजेता इंग्लंडचा जॅक आॅलिव्हर यांच्यात चुरस पाहायला मिळाली. दोघांनी पहिल्या प्रयत्नात अधिक वजन उचलले. दुसºया प्रयत्नात १४५ किलो वजन उचलणाºया आॅलिव्हरने स्नॅचमध्ये बाजी मारली. सतीशने क्लीन अ‍ॅन्ड जर्कमध्ये बाजी मारली.व्यंकट राहुलने जिंकले चौथे सुवर्णआर. व्यंकट राहुल याने ८५ किलो वजन गटात देदीप्यमान कामगिरी करीत राष्टÑकुल स्पर्धेच्या भारोत्तोलन प्रकारात चौथे सुवर्ण जिंकण्याचा मान मिळविला. २१ वर्षांच्या राहुलने एकूण ३३८ किलो वजन (१५१, १८७) उचलून अव्वल स्थान पटकाविले. राहुलला समोआचा डॉन ओपेलोज याच्याकडून आव्हानाचा सामना करावा लागला. त्याने एकूण ३३१ किलो वजन उचलले. दोघांनीही क्लीन अ‍ॅन्ड जर्कच्या अखेरच्या प्रयत्नात १९१ किलो वजन उचलण्याचा पर्याय निवडला. पण दोघेही अपयशी ठरले. प्रतिस्पर्धी खेळाडू १८८ किलो वजन उचलताना दुसºयाच प्रयत्नात अपयशी ठरताच राहुलचे सुवर्ण निश्चित झाले. ओपेलोज अखेरच्या प्रयत्नात यशस्वी ठरला असता तर राहुलला रौप्यावर समाधान मानावे लागले असते. मागच्या वर्षी राष्टÑकुल चॅम्पियनशिपदरम्यान राहुलने एकूण ३५१ किलो (१५६,१९५ किलो) वजन उचलले होते.टेबल टेनिस : भारतीय पुरुष, महिला उपांत्य फेरीतभारताच्या पुरुष आणि महिला टेबल टेनिस संघाने शनिवारी राष्टÑकुल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व लढतीत दोन्ही संघांचा सामना मलेशियाविरुद्ध होता. दोन्ही संघांनी वर्चस्व राखून ३-० ने विजय साजरा केला. पुरुषांना ९ एप्रिल रोजी सिंगापूरविरुद्ध उपांत्य सामना खेळावा लागेल. महिलांची उपांत्य लढत इंग्लंडविरुद्ध होईल. महिला एकेरीत मोनिका बत्राने एकतर्फी लढतीत मलेशियाची यिंग होवर ११-९, ११-७, ११-७ ने आणि मधुरिका पाटकरने पहिला सेट गमाविल्यानंतरही कारेन लायने हिच्यावर ७-११, ११-९, ११-९, ११-६ ने विजय साजरा केला.भारत-पाकहॉकी सामना ‘ड्रॉ’रोमहर्षकता शिखरावर पोहोचली असताना अखेरच्या ७ सेकंदांत भारतीय खेळाडूंनी अखेरच्या क्षणी गोल खाण्याच्या वृत्तीवर आवर न घातल्याने घात झाला. राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या पुरुष गटातील भारत-पाकिस्तान सलामी लढत शनिवारी २-२ ने बरोबरीत सुटली.राष्टÑीय स्पर्धेदरम्यान वजन उचलताना जांघेत जखम झाल्याने पदकाची अपेक्षा नव्हती. मांसपेशी दुखावल्याने मी फिट नव्हतो. जांघेत इतके दुखणे उमळले, की मला बसणे कठीण झाले होते. सरावात सातत्य नसल्यामुळे सुवर्णाची आस नव्हती; पण सर्वांच्या सहकार्यामुळे पदक जिंकू शकलो. मला अद्याप उपचारांची गरज आहे.- सतीश शिवलिंगम, सुवर्णविजेता भारोत्तोलक.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८