शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विराटनं कुंबळेच्या स्वागताचं ट्विट केलं डिलीट

By admin | Updated: June 22, 2017 18:42 IST

या रागाच्या भरात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या स्वागताचं ट्विट अकाऊंटवरून काढून टाकलं आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - कोहली आणि कुंबळे यांच्यातील वाद पराकोटीला गेला आहे. या रागाच्या भरात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या स्वागताचं ट्विट अकाऊंटवरून काढून टाकलं आहे. अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर 23 जून 2016 रोजी कोहलीनं हे ट्विट केलं होतं. कोहलीनं ट्विटमध्ये म्हटलं होतं की, अनिल कुंबळे सर तुमचं मनापासून स्वागत, आम्हाला तुमच्यासोबत काम करायला आवडेल. गेल्या 6 महिन्यांपासून कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात कोणत्याही प्रकारचं संभाषण झालं नसल्याची बाब समोर आली होती. या सर्व गोष्टी समजल्यानंतर बीसीसीआयलाही मोठा धक्का बसला होता.बीसीसीआय अधिका-यांना टीम इंडियामध्ये काही आलबेल नसल्याची आधीच शंका होती. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या नेतृत्वाखालील मुख्य सल्लागार समितीनंही कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यासाठी थेट हिरवा कंदील दाखवला नव्हता. या सर्व प्रकरणावर लंडनमधल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-यानं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, रिपोर्ट्समध्ये कुंबळेच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात विचार होता. मात्र सगळ्या अडचणी दूर झाल्यावरच कुंबळेला पुन्हा प्रशिक्षकपद दिलं पाहिजे, अशीही एक अट होती.आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये तीन वेगवेगळ्या बैठका झाल्या. पहिल्या बैठकीत कुंबळेनं बीसीसीआयचे अधिकारी, पदाधिकारी आणि सीएसी सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यानं कर्णधार कोहलीसोबत बैठक केली. मात्र तिसरी बैठक खूप महत्त्वपूर्ण ठरली. या बैठकीत कोहली आणि कुंबळे सोबत होते. तरीही कोहली आणि कुंबळेमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली.(धक्कादायक! 6 महिन्यांपासून कोहली आणि कुंबळेमध्ये होता अबोला)कोहली आणि कुंबळेनं गेल्या वर्षी डिसेंबर 2016मध्ये इंग्लंड टेस्ट सीरिज संपल्यानंतर एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं. दोघांमध्ये वाद होता ते माहीत होतं. मात्र ते 6 महिने एकमेकांशी बोलत नसल्यानं आम्हीसुद्धा अचंबित झालो, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोघांमध्ये एक बैठक झाली आणि एकमेकांसोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचं दोघांनाही समजलं. अनिल कुंबळेला वादामागील कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं विराटची कोणतीही समस्या नाही. पण माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर कोहलीला आक्षेप असल्याचं कुंबळेनं सांगितलं, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच विराटला वाटायचं की, स्वतः क्षेत्रातही अनिल कुंबळे हस्तक्षेप करतोय. कुंबळे स्वतःचा सल्ला नेहमीच कोहलीला देत होता. मात्र कोहलीला त्याचा तो सल्ला स्वतःच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्यासारखा वाटायचा, असंही बीसीसीआयच्या अधिका-यानं सांगितलं आहे.