आ. कृ. वाघमारे, शारदा मंदिर विजयी
By admin | Updated: August 23, 2014 22:31 IST
औरंगाबाद : आंतरशालेय साखळी खो-खो स्पर्धेत आ. कृ. वाघमारे व शारदा मंदिरने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
आ. कृ. वाघमारे, शारदा मंदिर विजयी
औरंगाबाद : आंतरशालेय साखळी खो-खो स्पर्धेत आ. कृ. वाघमारे व शारदा मंदिरने प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.मुलींच्या गटातील पहिल्या लढतीत आ. कृ. वाघमारे संघाने बजाजनगरच्या राजा शिवाजी विद्यालयाचा ८ गुणांनी पराभव केला. आ. कृ. वाघमारे संघाकडून सुकन्या जाधवने ३ मि. संरक्षण करुन २ गडी बाद केले. कावेरी सप्रेने २.३0 मि. पळतीचा खेळ करीत ४ गडी बाद केले. भक्ती मिसाळने ३ गडी बाद केले. राजा शिवाजी विद्यालयातर्फे प्रतीक्षा भगतने १.४0 आणि दिव्या लिंगायतने १.२0 मि. पळतीचा खेळ करीत २ गडी बाद केले.मुलांच्या गटात आ. कृ. वाघमारे प्रशालेने शिशुविहारचा १0 गुणांनी पराभव केला. आ. कृ. वाघमारे प्रशालेतर्फे सिद्धांत बाहेतीने २ मि. संरक्षण केले. नीलेश जडीतकरने ३ मि. संरक्षण करून ४ गडी बाद केले. शिशु विहारतर्फे विवेक पाटीलने एकाकी झुंज दिली.मुलींच्या गटातील दुसर्या सामन्यात शारदा मंदिर प्रशालेने राजा शिवाजी विद्यालयाचा ७ गुणांनी पराभव केला. शारदा मंदिरतर्फे ऋतुजा हाडे हिने ३ मि. संरक्षण करताना ५ गडी बाद केले. तिला वैष्णवी ढारगे हिने १ मि. संरक्षण करून २ गडी बाद करीत साथ दिली. शिवाजी विद्यालयातर्फे तन्वी वैद्यने १.४0 मि. संरक्षण केले तर मयुरी ढवळे हिने ५ गडी बाद केले.स्पर्धेत गोविंद शर्मा, गणेश बनकर, गंगाधर मोदाळे, संजय मुंढे, अनिल वावरे, उदय पंड्या, उमाकांत शिराळे, जयसिंग चव्हाण, विकास सूर्यवंशी, श्रीपाद लोहकरे, योगेश मुंगीकर, अमोल गायके, शुभम सुरळे, मनोज गायकवाड, योगेश साळुंके यांनी पंच म्हणून काम पाहिले.