शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कोलंबिया ‘शूटआऊट’

By admin | Updated: June 28, 2015 01:50 IST

कोपा अमेरिका स्पर्धेत चार वर्षांपूर्वी केलेली चूक सुधारत अर्जेंटिनाच्या कार्लोस टेवेझने कोलंबियाविरुद्ध निर्णायक पेनल्टीला गोलमध्ये रूपांतरित

कोपा फुटबॉल : अर्जेंटिना सेमी फायनलमध्ये

डेलमार (चिली) : कोपा अमेरिका स्पर्धेत चार वर्षांपूर्वी केलेली चूक सुधारत अर्जेंटिनाच्या कार्लोस टेवेझने कोलंबियाविरुद्ध निर्णायक पेनल्टीला गोलमध्ये रूपांतरित करीत संघाला शूटआऊटमध्ये ५-४ ने विजयी केले अन् सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. सेमी फायनलमध्ये आता अर्जेंटिनाची लढत ब्राझील आणि पॅराग्वे यांच्यातील विजयी संघाबरोबर होईल.रोमहर्षकतेचा कळस गाठलेल्या अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यातील या महत्त्वपूर्ण सामन्यात सर्वांची नजर टेवेझ याच्या निर्णायक पेनल्टीवर होती. याला कारण म्हणजे चार वर्षांपूर्वी टेवेझ शूटआऊटमध्ये पेनल्टीला गोलमध्ये बदलू शकला नव्हता. या ऐतिहासिक चुकीमुळे अर्जेंटिना कोपा अमेरिका स्पर्धेतून बाहेर पडला होता; परंतु तो कलंक पुसण्यात आज टेवेझ यशस्वी ठरला. कोलंबियाचा गोलरक्षक ओस्पिना याला चकवून त्याने गोल नोंदविला आणि अर्जेंटिना सेमी फायनलमध्ये दाखल झाला. अर्जेंटिना व कोलंबिया यांच्यातील अटीतटीचा सामना निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला. अर्जेंटिनाकडून लिओनेल मेस्सी, एजेकुएल गॅरे, एवेर बानेगा, जिकुवेल लॅवरेजी आणि कार्लोस टेवेझ यांनी पेनल्टीवर गोल केले. ओस्पिना ‘सामनावीर’टेवेझचा निर्णायक पेनल्टी रोखण्यात अपयशी ठरला असला तरी कोलंबियाचा गोलरक्षक ओस्पिना याने सामन्यात उत्कृष्ट गोलरक्षण केले. त्यामुळेच त्याला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला. ओस्पिनाने २५ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या सलग दोन आक्रमणांना थोपविले. सामना संपण्यास दहा मिनिटे राहिली असताना निकोलस ओटामेंडीचा हल्लाही परतवून लावला. त्याच्या या कामगिरीमुळे सामना शूटआऊटपर्यंत पोहोचला. हा विजय माझ्या संघसहकाऱ्यांसाठी आहे. मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे. आम्ही अजून येथे आहोत, याचा अर्थ आम्ही आपले काम चोखपणे करीत आहोत.- कार्लोस टेवेझ