नवी दिल्ली : क्रिकेटची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी खबरदारी घेताना बीसीसीआयने खेळाडूंच्या एजंटसाठी मान्यता प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंचे व्यावसायिक हित जपणाऱ्या व्यक्ती आचारसंहितेच्या कक्षेत असाव्या, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया म्हणाले, ‘नियमांची चाकोरी मजबूत करण्यासाठी खेळाडूंच्या एजंटसाठी नियम असणे आवश्यक आहे. त्यामुळे खेळाडूंचे व्यावसायिक हित जपणाऱ्या व्यक्ती आचारसंहितेच्या कक्षेत येतील. यासाठी लवकरच खेळाडू एजंट मान्यता प्रणाली लागू करण्यात येणार आहे.’बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले,‘सर्व संबंधित पक्षांसोबत याबाबत लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. यातील अनेक नियम स्वीकारार्य आहे. प्रस्तावित प्रणाली पारदर्शी असावी आणि ती अमलात आणण्यासाठी अडचण भासू नये, हा बोर्डाचा उद्देश आहे.’दुटप्पी धोरणाबाबत माहिती देण्याची सूचना करणाऱ्या बीसीसीआयने याव्यतिरिक्त विस्तृत नैतिकसंहिता तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.नैतिकसंहिता आणि एजंटचे करार याबाबत बीसीसीआय कार्यसमितीच्या पुढील बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. त्याआधी, बोर्डाचे सदस्य आणि क्रिकेट संघटनेचे संचालन करणाऱ्या पदावर असताना दुटप्पी भूमिका राहणार नाही, हे स्पष्ट करण्याचे निर्देश बीसीसीआयने दिलेले आहेत.दुटप्पी भूमिकेबाबत स्पष्ट करताना बोर्डाने म्हटले आहे की, क्रिकेट खेळात प्रत्यक्ष व्यावसायिक हित नसणे, अपेक्षित आहे. (वृत्तसंस्था)
खेळाडूंच्या एजंटसाठी आचारसंहिता
By admin | Updated: August 2, 2015 23:37 IST