हर्षा भोगले किंग्ज पंजाबबाबत बोलायचे झाल्यास ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांच्या यशाशिवाय बरेच काही आहे. या दोघांनी जी धडाकेबाज खेळी केली त्याचे श्रेय या दोघांना द्यायलाच हवे. कर्णधाराने उत्कृष्ट वातावरण निर्मिती केल्यामुळे हा संघ उत्कृष्ट कामगिरी करू शकला हे मी आधीही सांगितले आहे. आपल्या खेळाडूंना स्वत:च्या शैलीत खेळा, असे सांगणे सोपे आहे पण वास्तवात काहीच कर्णधार असे करू शकतात. याबाबतीत जॉर्ज बेली याने शानदार कामगिरी बजावली.पंजाबच्या कर्णधारपदाबाबत वीरेंद्र सेहवागला विचारणा झाली होती असे मी ऐकले आहे. पण असे घडले नाही या गोष्टीचा आनंद वाटतो. सेहवाग स्वत: आनंदी असून कुठलाही दबाव न बाळगता फलंदाजी करीत आहे. स्पर्धेत अद्याप मोठी खेळी न करता देखील संघासाठी तो मोलाची भूमिका वठवितो आहे. सेहवागकडे नेतृत्व सोपविण्यामागील भावना ही देखील असू शकते की तो स्थानिक खेळाडूंची क्षमता उत्तमपणे ओळखतो शिवाय त्यांचा पुरेपूर वापर करू शकला असता.पण हीच भूमिका संजय बांगर उत्तमपणे वठवित आहे. संजय खूपच शांतप्रवृत्तीचा माणूस आहे. तो आक्रमक वागत नाही. नवा विचार देतो आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाय जमिनीवर आहेत. भारतीय संघाला त्याची गरज होती तेव्हा एक क्रिकेटपटू या नात्याने त्याने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. भारतीय संघाला गरज नव्हती तेव्हा रेल्वेसाठी त्याने सर्वस्व पणाला लावले. उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर केल्यामुळेच रेल्वेचा संघ सर्वोत्तम ठरला होता.याच भूमिकेतून बांगरने पंजाब संघासाठी काम केले.भारतीय क्रिकेटबाबत त्याच्या कौशल्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले.आता बांगरला प्रतिभवान पण अद्याप कुणाचे लक्ष वेधू शकले नाहीत अशा खेळाडूंना निवडण्याची संधी दिली जावी. संदीप शर्मा आणि अक्षर पटेल यांना संघात सहभागी करून घेण्याचा त्याचा निर्णय अतिशय परिणामकारक सिद्ध होत आहे. मी मात्र शिवम शर्माच्या गोलंदाजीचा आनंद अनुभवला. तो चेंडू वळवतो आणि फ्लाईटही करतो.शिवाय त्याची गोलंदाजी शैली अतिशय स्पष्ट आहे. परिस्थिती कशीही असली तरी तो दबावात वावरत नाही. बांगरने मला आयपीएल सुरू होण्याआधी त्याच्याबाबत सांगितले होते. पण प्रामाणिकपणे सांगायचे तर त्याचे नाव मी विसरलो होतो. बांगरसारखे कोच भारतीय क्रिकेटला भक्कमपणा प्रदान करतात. स्पर्धा जिंकण्यासाठी तुम्हाला मोठ्या नावांची गरज पडू शकते. पण बांगरचे युवा प्रतिभवान खेळाडू देखील स्वत:ची जबाबदारी शिताफीने पूर्ण करीत आहेत. या खेळाडूंचे काम आहे विजयात मोलाचे योगदान देणे! भारतासारख्या देशात क्रिकेटची चर्चा सध्या वेगळ्या कारणांमुळे रंगत असताना ही वेगळी यशस्वी पायरी पहायला व अनुभवायला मिळाली.(टीसीएम)
बांगरसारखे कोच भारतीय क्रिकेटला भक्कम करतात!
By admin | Updated: May 14, 2014 01:58 IST