शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात होणार ‘प्रशिक्षक बँक’; राज्यवर्धन राठोड यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:59 IST

पायाभूत स्तरावर विविध खेळांतील प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि ओळख देण्याचा हेतू पुढे ठेवून क्रीडा मंत्रालय प्रशिक्षकांची बँक तयार करणार आहे. या प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालय स्वत: प्रमाणपत्र देईल.

नवी दिल्ली : पायाभूत स्तरावर विविध खेळांतील प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि ओळख देण्याचा हेतू पुढे ठेवून क्रीडा मंत्रालय प्रशिक्षकांची बँक तयार करणार आहे. या प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालय स्वत: प्रमाणपत्र देईल.क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, ‘पायाभूत स्तरावर प्रशिक्षकांची फळी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षक योजना कार्यरत असेल. यात प्रशिक्षकांचे वर्गीकरण होईल. खेळाडूंना विकास प्रक्रियेत पायाभूत कोच विकासात्मक प्रशिक्षक आणि नंतर अनुभवी प्रशिक्षक लागतो. त्याच पद्धतीने प्रशिक्षकांची फळी निर्माण केली जाईल. आधी आम्ही विशेष प्रशिक्षक तयार करू. हे प्रशिक्षक पायाभूत स्तरावरील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील. तज्ज्ञ प्रशिक्षक हे एकप्रकारे ‘आयएसआय’मार्कसारखे असतील. यामुळे पालक, शाळा, कॉलेजेस अशा प्रशिक्षकांची सेवा विश्वासाने घेऊ शकतील. प्रशिक्षकांची बेसिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध असेल. या प्रशिक्षकांनी रिफ्रेशर कोर्स कधी केला हे सहा- सहा महिन्यांच्या फरकाने अपडेट केले जाईल.’कौशल्य विकास मंत्रालयाला या योजनेत सहभागी केले जात असल्याचे सांगून आॅलिम्पिक रौप्य विजेते नेमबाज राठोड पुढे म्हणाले,‘पुढील चार- पाच महिन्यात ही योजना मोठ्या स्तरावर लागू होईल. यासाठी अभ्यासक्रम तयार होत असून विदेशी एजन्सीची निवड केली जाईल. खेळाडूंचा विकास प्रशिक्षकांच्या विकासावर विसंबून असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.’भारतात प्रशिक्षकांच्या विकासाचा ठोस कार्यक्रम नाही. विदेशी प्रशिक्षकांना करारबद्ध करतेवेळी ते भारतीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील अशी अट असते, पण त्याचे पालन होताना दिसत नाही. आता आम्ही विदेशी प्रशिक्षक भारतीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील याची खात्री करून, असे राठोड यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)प्रशिक्षकांना मिळणार प्रोत्साहन रक्कम : आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंच्या सुरुवातीच्या प्रशिक्षकाला प्रोत्साहन रकमेचा वाटा देण्याची घोषणा राठोड यांनी केली. एखाद्या खेळाडूने पदक जिंकल्यास पुरस्कार रक्कम त्याच्या सध्याच्या प्रशिक्षकाला दिली जात असे. पण यापुढे ५० टक्के रक्कम सध्याच्या कोचला, ३० टक्के विकासात्मक कोचला आणि २० टक्के रक्कम सुरुवातीच्या कोचला दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.