शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅशेसनंतर क्लार्क निवृत्त

By admin | Updated: August 9, 2015 01:05 IST

दुखापतीमुळे त्रस्त असलेला आणि सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेला आॅस्ट्रेलियाचा प्रेरणादायी कर्णधार मायकल क्लार्कने आज परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध

नॉटिंगहॅम : दुखापतीमुळे त्रस्त असलेला आणि सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असलेला आॅस्ट्रेलियाचा प्रेरणादायी कर्णधार मायकल क्लार्कने आज परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध पाचव्या व अखेरच्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याची घोषणा केली. कारकिर्दीदरम्यान पाठ व टाचेच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या ३४ वर्षीय क्लार्कने वन-डे आंतरराष्ट्रीय व टी-२० क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. आज चौथ्या अ‍ॅशेस कसोटीमध्ये इंग्लंडविरुद्ध आॅस्ट्रेलियाला १ डाव व ७८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना क्लार्क म्हणाला, ‘‘माझ्याकडे अद्याप एक कसोटी सामना शिल्लक आहे. त्यानंतर माझी कारकीर्द संपणार आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे.’’आजच्या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आणि पुन्हा एकदा अ‍ॅशेस करंडकावर नाव कोरले. पाचवा व अखेरचा कसोटी सामना २० आॅगस्टपासून ओव्हलमध्ये खेळला जाणार असून, हा क्लार्कचा कारकिर्दीतील ११५वा कसोटी सामना राहील. पुरस्कार वितरण समारंभात भावुक झालेला क्लार्क म्हणाला, ‘‘मी ओव्हलमध्ये अंतिम कसोटी सामना खेळण्यास इच्छुक आहे. हा माझ्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना असेल. कोणीही सोडून जाण्यास उत्सुक नसतो, पण गेल्या १२ महिन्यांतील माझी कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही.’’सन २०११मध्ये रिकी पॉन्टिगच्या स्थानी संघाचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या क्लार्कला गेल्या सहा कसोटी सामन्यांत एकदाही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. क्लार्कसाठी ही निराशाजनक कामगिरी आहे. क्लार्कने कर्णधार म्हणून पहिल्या ३० सामन्यांत १२ शतके ठोकली होती. याव्यतिरिक्त परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे क्लार्क निराश झाला आहे. त्यातील दोन पराभव तीन दिवसांमध्ये पत्करावे लागले. कारकिर्दीत २८ शतके ठोकणारा क्लार्क म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेटला अ‍ॅशेसची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केला, पण आमचा निभाव लागला नाही. आता पुढच्या पिढीची वेळ आहे.’’(वृत्तसंस्था)मी काल मैदानावरून परतताना निवृत्तीचा निर्णय घेतला. माझ्या सहकाऱ्यांना याचे आश्चर्य वाटतेय. मी आताच निवृत्ती स्वीकारेन, याची त्यांनी कल्पना केली नव्हती. माझे जे काही आहे ते सर्व क्रि केटचे आहे. या खेळाच्या असंख्य आठवणी माझ्यासोबत असतील. मी खेळाडूंचा उत्साह वाढविण्यास इच्छुक आहे. ही योग्य वेळ असून, मायक्रोफोनवर आपणासोबत समालोचन कक्षात स्थान मिळेल, अशी आशा आहे.- मायकल क्लार्क