शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

सिटी अजूनही विजेतेपदाच्या शर्यतीत

By admin | Updated: March 18, 2017 06:03 IST

प्रीमियर लीग विजेतेपद पटकावण्याच्या शर्यतीतून मँचेस्टर सिटी अजिबात बाहेर पडले नसल्याचे ठाम मत संघाचा स्टार मिडमिल्डर याया टौरे याने मांडले. त्याचवेळी सिटीचा

- याया टौरे याच्याशी बातचितप्रीमियर लीग विजेतेपद पटकावण्याच्या शर्यतीतून मँचेस्टर सिटी अजिबात बाहेर पडले नसल्याचे ठाम मत संघाचा स्टार मिडमिल्डर याया टौरे याने मांडले. त्याचवेळी सिटीचा आगामी सामना अव्वल चार प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेल्या लिव्हरपूलविरुध्द होणार असून यासाठी आम्ही पुर्णपणे सज्ज असल्याचेही यायाने म्हटले आहे. सिटी संघात मुख्य मध्यरक्षक म्हणून खेळण्याची जबाबदारी मिळाल्यापासून याया संघाचा महत्त्वाच भाग बनला आहे. त्याच्या निर्णायक कामगिरीमुळे संघाचे आक्रमण जबरदस्त सुधारले आहे. त्यात आगामी लिव्हरपूलविरुध्दच सामना सिटीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून यामध्ये बाजी मारल्यास मँचेस्टर सिटी गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी पोहचतील. परंतु, त्यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण ठरेल ती चेल्सीची. अग्रस्थानी असलेल्या चेल्सीने स्पर्धेत मोठी आघाडी घेतली असून सिटीने दुसरे स्थान मिळवले तरी, त्यांच्यात व चेल्सीमध्ये मोठे अंतर राहिल. या सामन्याआधी यायानेही कोणतीही गोष्ट असाध्य नाही असे सांगत रणशिंग फुंकले आहे...मँचेस्टर सिटीने नुकताच मोनॅकोविरुध्द शानदार खेळ केला. त्याच खेळाची लिव्हरपूलविरुध्द अपेक्षा करु शकतो का?- नक्कीच. आम्ही चांगल्या लयीमध्ये असून हाच खेळ आम्हाला कायम ठेवायचा आहे. जर का हीच कामगिरी आम्ही कायम राखली, तर आमच्या पाठिराख्यांमध्ये निश्चित वाढ होईल.आक्रमकतेने खेळण्याची रणनिती टीम मॅनेजरची आहे का?- हो. सुरुवातीपासून आम्ही आक्रमक खेळ करुन गोल केले आहेत. संघाचे नवीन मॅनेजर आक्रमक रणनितीचे आहे. काहीवेळा खेळताना चुका होतात. पण, हे सर्व खेळाचा एक भाग आहे. जर तुम्ही चुकत नसाल तर तुम्ही फुटबॉल कधीच शिकणार नाही.अनेकांच्या मते, अशा प्रकारे खेळत राहिल्यास सिटी जेतेपद जिंकणार नाही. काय सांगशील?- नक्कीच आम्ही अशा प्रकारे खेळून ट्रॉफी जिंकू शकतो. आम्हाला माहितेय आम्ही गोल केलेत आणि तोच खेळ आम्हाला कायम ठेवायचा आहे. क्लबने आमच्यासाठी खूप पैसा ओतलाय आणि तो विश्वास आम्हाला गमवायचा नाही. आमच्याकडे मोठे खेळाडू असून आम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकायच्या आहेत.निराशाजनक कामगिरीनंतर सिटीने जबरदस्त पुनरागमन केले. याचे अधिक कौतुक झाले नाही असे वाटते का?- कदाचित हो. पण कदाचित आमच्याकडे दाखवण्यासारखा इतिहास नाही म्हणून असे असेल. जेव्हा तुम्ही मँचेस्टर युनायटेडसारख्या संघाला पाहता, तेव्हा लोकांना त्यांच्याकडे बघून विश्वास वाटतो. कारण त्यांनी अनेकदा पिछाडीवरुन विजय मिळवलेला आहे. आमचे लक्ष केवळ सर्वोत्तम खेळ करण्यावर असून त्याआधारे आम्ही आमचा स्वत:चा इतिहास उभारु.युनायटेड संघासारखंच एकदिवस सिटीदेखील मजल मारेल असे वाटते का?- हो आणि त्यानुसार योजना आहेत. संघात कायम मोठ्या खेळाडूंना स्थान देऊन मोठ्या स्पर्धा जिंकायच्या हीच सिटीची योजना आहे. याजोरावर युनायटेड किंवा बार्सिलोनासारख्या संघात आमच्या संघाचे परिवर्तन करायचे आहे. यासाठीच मी या संघात आलो असून आम्ही आमचे सर्वोत्तम योगदान देत आहोत. (पीएमजी)