शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

चेन्नई स्लॅमला विजेतेपद

By admin | Updated: August 2, 2016 04:20 IST

चेन्नई स्लॅम संघाने नियोजनबद्ध खेळ करीत यूबीए प्रो बास्केटबॉल लीगच्या तिसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले.

पुणे : चेन्नई स्लॅम संघाने नियोजनबद्ध खेळ करीत यूबीए प्रो बास्केटबॉल लीगच्या तिसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेली निर्णायक लढत चेन्नईने ६९-५९ अशी जिंकली.धडाकेबाज खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाबला गेल्या लढतीतील आपला फॉर्म कायम ठेवण्यात अपयश आले. दुसरीकडे, योग्य नियोजन आणि कल्पकतेची जोड देऊन चेन्नईने चारही क्वाटर्समध्ये वर्चस्व राखले. यासह चेन्नईने १० लाख, तर उपविजेत्या पंजाबने ५ लाखांच्या पारितोषिकवर कब्जा केला.सामन्याचा प्रारंभ फायनलला साजेशा झाला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करीत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंजाबच्या आक्रमणाला नियोजनाची जोड नव्हती. यामुळे चेन्नईला पहिल्या क्वार्टरमध्ये १९-१८ अशी अल्प पण महत्वाची आघाडी घेता आली. चेन्नईने टर्नओव्हर्स मधून ६ तर, पंजाबने २ गुण प्राप्त केले. सेकंड चान्स पॉइंटमधून चेन्नईने २, तर पंजाबने ४ गुणांची कमाई केली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये चेन्नईच्या खेळाडूंनी काऊंटर अटॅक करीत पंजाबला बॅकफूटवर ढकलले. आशुतोषने शैलीदार खेळाच्या जोरावर मध्यंतराला ५ मिनिटे शिल्लक असताना चेन्नईला ३०-१८ अशी १२ गुणांची आघाडी मिळवून दिली. जयराम व गोपाळ यांना दुखापत होऊनही चेन्नईने मध्यंतराला ३६-२४ अशी आघाडी मिळवली. स्टार खेळाडू गॅरीचे अपयश पंजाबसाठी महागडे ठरले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पंजाबचे पुनरागमनाचे प्रयत्न उधळून लावत चेन्नईने ५०-४० अशी आघाडी घेतली. चौथ्या आणि अंतिम क्वार्टरमध्ये पंजाबने गुणांचा सपाटा लावला. या ‘लो स्कोअरिंग’ सामन्यात चेन्नईच्या दुखापतींचा फायदा उचलण्यातही पंजाब अपयशी ठरले. जयरामला दुखापत असूनही तो २५ मिनिटे मैदानावर होता. (क्रीडा प्रतिनिधी)निर्णायक कामगिरीसह कॅमे ठरला हीरोचेन्नईसाठी १७ गुणांची कमाई करणारा कॅमे ‘फायनल हीरो’ ठरला. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पंजाबकडून रायनने सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. पुणे पेशवाजच्या नरेंदर ग्रेवालला तिसऱ्या हंगामातील ‘मोस्ट व्हल्युएबल प्लेयर’ म्हणून गौरविण्यात आले. नरेंदरने या हंगामात सरासरी ३१.८ गुणांची कमाई केली. शिवाय स्कोरिंग टायटलदेखील त्यानेच पटकावले.अंतिम निकाल :चेन्नई स्लॅम : ६९ ( कॅमे १७, आशुतोष १७, अगू १५) विवि पंजाब स्टिलर्स : ५९ (रायन १३, राजवीर १३, हरमनदीप १२)