नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) आणि राजस्थान रॉयल्सला आयपीएलमधून बाद केले असले, तरी आगामी आयपीएलच्या आठव्या पर्वात हे संघ खेळतील, अशी माहिती आयपीएल आयुक्त रंजीब बिस्वाल यांनी दिली. कोर्टाने भ्रष्टाचारप्रकरणी जी समिती स्थापन केली, तिला आपला अहवाल सहा महिन्यात द्यायचा असल्याने हे दोन्ही संघ यंदा आयपीएल खेळू शकतील, असा बिस्वाल यांचा युक्तिवाद आहे.माजी मुख्य न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली पुढील सहा महिन्यांत दोन्ही फँ्रचायसींविरुद्ध तपास करून अहवाल सादर करणार आहे. अशा वेळी आयपीएल-८ आटोपल्यानंतरच हा अहवाल येण्याची शक्यता असल्याने दोन्ही फ्रँचायसी तोवर खेळू शकतील. एका वाहिनीशी बोलताना बिस्वाल पुढे म्हणाले, ‘‘न्यायालयाचा आदेश आम्हाला आयपीएल-८ ची योजना आखण्यापासून रोखू शकत नाही. चेन्नई आणि राजस्थान संघ आयपीएल-८ चा भाग आहेत.’’बिस्वाल म्हणाले, ‘‘गतवर्षी यूएईत काही सामने खेळविण्यात आले; पण तेथे भ्रष्टाचार झाल्याची एकही तक्रार ऐकिवात नाही. आयपीएल संचालन परिषदेची बैठक ३ फेब्रुवारी रोजी होत असून, बैठकीत लिलावाची तारीख निश्चित होईल. विश्वचषक १४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून, त्याआधी खेळाडूंचा लिलाव पार पाडला जाईल.’’ (वृत्तसंस्था)ओडिशा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले बिस्वाल पुढे म्हणाले, ‘‘आयपीएलच्या आठव्या पर्वाचे आयोजन ८ संघांच्या समावेशाचेच असेल. सीएसके आणि राजस्थानला काढून टाकण्यास सांगण्यात आले तरी आम्ही सज्ज आहोत; पण सध्या तशी परिस्थिती नाही.’’ आयपीएल-८ चे आयोजन भारतातच होईल,
चेन्नई, राजस्थान आयपीएलमध्ये राहतील : बिस्वाल
By admin | Updated: January 25, 2015 01:56 IST