शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

चौटालांची पद सोडण्याची तयारी

By admin | Updated: December 30, 2016 03:11 IST

सर्व स्तरातून टीकेला सामोरे जात असलेले अभय सिंग चौटाला यांनी गुरुवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) आजीवन अध्यक्षपदावरून दूर होण्याचा

नवी दिल्ली : सर्व स्तरातून टीकेला सामोरे जात असलेले अभय सिंग चौटाला यांनी गुरुवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाच्या (आयओए) आजीवन अध्यक्षपदावरून दूर होण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीला त्यांच्या प्रमोशनवर कुठली अडचण असेल तरच मी पद सोडण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. चौटाला यांच्याविरुद्ध मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चौटाला व २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सुरेश कलमाडी यांना ‘आयओए’च्या २७ डिसेंबरला चेन्नईमध्ये झालेल्या वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्षपद बहाल करण्यात आले. त्यामुळे भारतीय क्रीडा वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले, तर क्रीडा मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली. कलमाडी यांनी बुधवारी हे पद स्वीकारण्यास नकार दिला तर चौटाला यांनी गुरुवारी सशर्त पद सोडण्याची तयारी दशर्वली. आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी हे प्रकरण आयओसीपुढे ठेवायला हवे. चौटाला यांनी क्रीडामंत्री विजय गोयल यांच्यावर टीका केली. क्रीडा मंत्रालयातर्फे आयओएला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या वादग्रस्त निर्णयासाठी मंत्रालयाने आयओएची मान्यता रद्द करण्याची धमकी दिली आहे. अभय सिंग चौटाला म्हणाले...आयओएने आजीवन अध्यक्षपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्यांचा आभारी आहे. मी आयओएच्या अध्यक्षांना यापूर्वी एक पत्र लिहिले असून, त्यात आयओए अध्यक्षांनी याबाबत आयओसीसोबत खासगी चर्चा करावी आणि आयओसीला मी हे मानद पद सांभाळण्यास कुठली अडचण असेल तर भारतीय खेळ, खेळाडू, सुशासन, पारदर्शिता आणि भारतीय खेळाच्या हितासाठी मला माझ्या पदाचा त्याग करण्यास आनंद वाटेल.क्रीडामंत्री गोयल यांची प्रतिक्रिया आणि मीडियामध्ये या प्रकरणाचा होत असलेला ऊहापोह याचे मला आश्चर्य वाटले. मी २०१३ मध्ये त्याग केला होता. त्यावेळी मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. खरे बघता घटनेनुसार माझी अध्यक्षपदी निवड झाली होती. तीन प्रसिद्ध न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये पारदर्शिता राखण्यात आली होती. रिओ आॅलिम्पिकमध्ये माझ्या उपस्थितीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मला क्रीडामंत्र्यांच्या वर्तनाची चांगल्या प्रकारे कल्पना आहे. रिओमध्ये क्रीडामंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांच्या व्यवहारावर आयओसीने प्रश्न उपस्थित करताना त्यांचे अ‍ॅक्रिडेशन कार्ड परत घेण्याची धमकी दिली होती. या प्रकरणावर अधिक भाष्य करण्याची माझी इच्छा नाही. जर गरज भासली तर रिओ आॅलिम्पिकचे हे प्रकरण पंतप्रधानांना नक्की सांगेल.‘आयओए’ला आजच उत्तर द्यावे लागणारक्रीडा मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक महासंघाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, आज, शुक्रवारपर्यंत याला उत्तर द्यावे लागणार आहे. सुरेश कलमाडी व अभय सिंग चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय रद्द केला नाही तर मान्यता काढण्यात येईल, अशी ताकीद क्रीडा मंत्रालयाने आयओएला दिली आहे. मंत्रालयाने नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘तुमचे उत्तर ३० डिसेंबर २०१६ला सायंकाळी ५ वाजेपर्यंत या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या कार्यालयात मिळायला हवे. यात जर अपयशी ठरला तर या प्रकरणात तुमच्याकडे सांगण्यासाठी काहीच नसल्याचे गृहीत धरण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.’ चौटालांसोबत काही वैयक्तिक वाद नाही; पण भारतीय खेळाच्या हितासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे, असे क्रीडामंत्री गोयल यांनी स्पष्ट केले. आयओसीसोबत चर्चा केल्यानंतरच उत्तर देणार : आयओएकलमाडी व अभय सिंग चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर क्रीडा मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक महासंघाला नोटीस बजावली असून, आज उत्तर मागितले आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीसोबत चर्चा केल्यानंतरच आयओए उत्तर देणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मंत्रालयाच्या नोटिसीला निर्धारित वेळेत आयओए उत्तर देणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आयओएचे अध्यक्ष सध्या देशाच्या बाहेर आहेत. ते न्यूझीलंडमध्ये आहेत. आम्ही कारणे दाखवा नोटीसचे आज उत्तर देणार नाही. आम्ही अशा प्रकारच्या नोटीसला थेट उत्तर देऊ शकत नाही. आॅलिम्पिक चार्टरनुसार आयओए स्वायत्त संस्था आणि सरकारी हस्तक्षेपापासून स्वतंत्र आहे. या नोटीसला उत्तर देण्यापूर्वी आयओसीसोबत चर्चा केल्यानंतर उत्तर देण्याबाबत विचार करू.गोयल यांनी ‘आयओए’च्या अध्यक्षांना सुनावलेमुंबई : सुरेश कलमाडी व अभय चौटाला यांची दोन दिवसांपूर्वी आयओएच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याप्रकरणी क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना सुनावले. या प्रकरणात आयओएचे प्रमुख दोषी आहेत. कार्यक्रम पत्रिकेमध्ये विषय नसताना त्यांनी हा विषय मांडला, असे गोयल यांनी सांगितले. गोयल म्हणाले, ‘आयओएचे काम नैतिकता व सिद्धांतानुसार व्हायला हवे, पण त्यांनी सुरेश कलमाडी व अभय चौटाला यांची आजीवन अध्यक्षपदी निवड केली.’