शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशसमोर 459 धावांचे आव्हान

By admin | Updated: February 12, 2017 14:23 IST

ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 12 - एकमेव कसोटीत भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 459 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या डावात 299 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 159 धावा कुटत आपली आघाडी 458 धावांवर पोहोचवली आणि दुसरा डाव घोषित केला.दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताचे दोन्ही सलामीवीर मुरली विजय (7), लोकेश राहुल ...

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 12 - एकमेव कसोटीत भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 459 धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिल्या डावात 299 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 159 धावा कुटत आपली आघाडी 458 धावांवर पोहोचवली आणि दुसरा डाव घोषित केला.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताचे दोन्ही सलामीवीर मुरली विजय (7), लोकेश राहुल (10) झटपट बाद झाले. मात्र चेतेश्वर पुजारा (नाबाद 54), विराट कोहली (38), अजिंक्य रहाणे (28) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 16) यांनी झटपट फलंदाजी करत भारताची आघाडी साडेचारशेच्या पलिकडे पोहोचवली. 
भारताच्या  687 धावांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशने मुशफिकूर रहिमच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात चिवट फलंदाजी करत 388 धावांपर्यंत मजल मारली. मात्र बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 299 धावांनी मागे राहिल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने पाहुण्यांना फॉलो ऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताने दुसऱ्या डावात बिनबाद एक धाव केली होती. 
तत्पूर्वी कालच्या 6 बाद 322 धावांवरून पुढे खेळणाऱ्या बांगलादेशच्या फलंदाजांनी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चिवट फलंदाजी केली. शानदार शतकी खेळी करणाऱ्या कर्णधार मुशफिकूर रहिमने तळाच्या फलंदाजांच्या साथीने बांगलादेशच्या धावसंख्येत अजून 66 धावांची भर घातली. त्याबरोबरच भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक फटकावणारा मुशफिकूर बांगलादेशचा पहिला फलंदाज ठरला. एक बाजू लावून धरणारा मुशफिकूर 127 धावांवर बाद झाल्यावर बांगलादेशचा डाव 388 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून उमेश यादवने तीन, तर अश्विन आणि जडेजाने दोन गडी बाद केले.