शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

बांग्लादेशला ३१८ धावांचे आव्हान

By admin | Updated: June 24, 2015 18:37 IST

बांग्लादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमवल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघाने बांग्लादेशला ५० षटकात ३१८ धावांचे आव्हान दिले आहे.

ऑनलाइन टीम
मीरपूर, दि. २४ - बांग्लादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमवल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघाने बांग्लादेशला ५० षटकात ३१८ धावांचे आव्हान दिले आहे. तिस-या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या फलंदाजानी चांगली कामगिरी करत ५० षटकात सहा बाद ३१७ धावा केल्या.  
या सामन्यात भारतीय फलंदाज शिखर धवनने सर्वाधिक जास्त  धावा केल्या. त्याने ७३ चेंडूत १० चौकार लगावत ७५ धावा केल्या, त्याला गोलंदाज मशरफी मूर्तजाने झेलबाद केले. तर, त्यापाठोपाठ आलेल्या महेंद्रसिंग धोणीने दमदार सुरुवात करत ७६ चेंडूत एक षटकार आणि सहा चौकारांचा मारा करत ६९ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाची धावसंख्या भक्कम होत गेली. महेंद्रसिंग धोणीलाही गोलंदाज मशरफी मूर्तजाने झेलबाद केले. याआधी अंबाती रायडू (४४) विराट कोहली (२५), रोहित शर्मा (२९) आणि सुरेश रैना ३८ धावांवर बाद झाला. त्यानंतर स्टुअर्ट बिन्नीने नाबाद ९ चेंडूत दोन चौकारासह १५ धावा केल्या, तर अक्षर पटेलने शेवटच्या षटकात एक षटकार लगावत नाबाद १० धावा केल्या.  
बांग्लादेशकडून गोलंदाज मशरफी मूर्तजाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले, तर मुस्तफिजूर रहमानने दोन आणि साकिब हसनने एक विकेट घेतला.