शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

चॅपेल रिंगमास्टरसारखे वागायचे

By admin | Updated: November 4, 2014 01:41 IST

२00५ ते २00७ या काळात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल हे रिंगमास्टर प्रमाणे वागायचे.आपले म्हणणे खेळाडूंवर लादत आणि त्यांचे म्हणणे ऐकूण घेत नव्हते

नवी दिल्ली : २00५ ते २00७ या काळात भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेले ग्रेग चॅपेल हे रिंगमास्टर प्रमाणे वागायचे. आपले म्हणणे खेळाडूंवर लादत आणि त्यांचे म्हणणे ऐकूण घेत नव्हते, त्यांनी द्रवीडला हटवून आपणाला कर्णधार करण्याचे आमिष दाखविले होते, असा बाउन्सर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्या फ्लेर्इंग इट माय वे या आगामी आत्मचरित्रात टाकला आहे. या पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन होत आहे.सचिनने या पुस्तकात म्हंटले आहे की, २00७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी काही महिने अगोदर चॅपेल माझ्या घरी आले. ते म्हणाले की, ‘‘राहुल द्रवीड कर्णधारपदासाठी योग्य व्यक्ती नाही. त्याला या पदावरुन हटवून त्याच्या जागी तुझी निवड करण्यास मी तुला मदत करु शकतो. असे झाले तर आपण दोघे भारतीय क्रिकेटवर राज्य करु.’’सचिन लिहितो की, त्यांचा हा प्रस्ताव ऐकून मी आणि पत्नी अंजली दोघेही स्तब्धच झालो. क्रिकेटचा वर्ल्डकप काही दिवसांवर आला असताना कर्णधाराविषयी प्रशिक्षकाची भावना पाहून आम्ही हैराण झालो होतो. सचिन म्हणतो की, अर्थातच त्यांच्या या प्रस्तावाला मी नकार दिला. जवळजवळ दोन तास मला समजावण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर चॅपेल निघून गेले. भारतीय संघासोबतही त्यांची वागणूक चांगली नसल्याचे सचिनने पुस्तकात म्हंटले आहे. तो म्हणतो चॅपेल हे रिंगमास्टरसारखे वागायचे. खेळाडूंचे म्हणणे ते ऐकून घेत नसत, उलट त्यांच्यावर आपले म्हणणे थोपवित असत. चॅपेल यांच्या सुचनेमुळे मी खूप नाराज झालो होतो. त्यावेळी मी बीसीसीआयला सुचना केली होती की, वर्ल्डकपला संघासोबत चॅपेल यांना पाठवू नका. संघातील वरिष्ठ खेळाडू संघावर नियंत्रण ठेवतील. पण माझे म्हणणे बीसीसीआयने ऐकले नाही. चॅेपेल यांना संघाबरोबर पाठविले. २00७च्या वर्ल्डकप मोहीमेचा भयावह अंत झाला. भारतीय संघाला पात्रता फेरीतूनच बाहेर पडावे लागले. संघ श्रीलंका आणि बांगलादेशकडून पराभूत झाला आणि केवळ बर्म्युडा संघाविरुध्दच जिंकला.