शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

एफसी गोवाविरुद्ध कारवाईची शक्यता

By admin | Updated: December 27, 2015 02:33 IST

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची शिस्तपालन समिती पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत चेन्नईयन एफसीविरुद्धच्या अंतिम सामन्यात गैरवर्तन

नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची शिस्तपालन समिती पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत चेन्नईयन एफसीविरुद्धच्या अंतिम सामन्यात गैरवर्तन केल्यामुळे एफसी गोवा संघावर कारवाई करू शकते.आयएसएलच्या फायनल लढतीत चेन्नईयन एफसीकडून २-३ गोलफरकाने पराभूत झालेल्या एफसी गोवा संघाने सामन्यादरम्यान गैरवर्तन केले होते. त्यामुळे एआयएफएफची शिस्तपालन समिती त्यांच्यावर कारवाई करू शकते. सामना आयुक्त ए. के. मामुकोया यांनी त्यांच्या अहवालात भारतीय फुटबॉल संघाला एफसी गोवाविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटले, की तीन जपानी रेफ्रींना एफसी गोवाचा स्टाफ आणि खेळाडूंनी सामन्यादरम्यान धमकी दिली होती. आपल्या दोन पानांच्या अहवालात आयुक्तांनी सामन्याची फायनल शिटी वाजल्यानंतर एफसी गोवाचे काही खेळाडू आणि अधिकारी रेफ्रीजवळ आले आणि त्यांनी त्यांना घेराव घालून धमकावले, असे म्हटले आहे. खेळाडूंच्या या वर्तनामुळे आपल्याला जपानच्या रेफ्रींचा बचाव करावा लागला. खेळाडूंनी रेफ्रीविरुद्ध अपशब्दाचा उपयोग आणि धक्काबुक्की केल्याचे मामुकोया यांनी सांगितले. एफसी गोवाच्या पदाधिकाऱ्यांनी लॉकर रूममध्येदेखील रेफ्रींना धमकी दिली होती. तथापि, या पूर्ण वादादरम्यान आयएसएल चॅम्पियन चेन्नईयन एफसीचे वर्तन खूपच शांत आणि समजूतदारीपूर्ण होते.असा दावाही आयुक्तांनी त्यांच्या अहवालात केला.ते म्हणाले, ‘‘आपल्या दृष्टिकोनातून अखेरची शिटी वाजल्यानंतर एफसी गोवाचे गैरवर्तन अनावश्यक होते. हे वर्तन भयावह आणि दबाव निर्माण करणारे होते. हे सर्व खिलाडू वृत्तीच्या विरुद्ध होते. गोवा संघाने आपला पराभव मान्य करायला हवा होता आणि खेळाचा सन्मान करायला हवा होता. दुसरीकडे चेन्नईयन संघाचे वर्तन खूपच सन्मानजक होते आणि त्यांनी त्यांच्या विजयाचा जल्लोषही संयमाने साजरा केला. अशा वर्तनामुळे परदेशी खेळाडू भारतात येण्याआधी दोनदा विचार करतील, तसेच भारतीय फुटबॉलच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे.’’