शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

नवख्या अफगाणिस्तानपुढे अनुभवी आॅस्ट्रेलियाचे आव्हान

By admin | Updated: March 3, 2015 23:46 IST

चार वेळा जेतेपदाचा मान मिळविणारा अनुभवी आॅस्ट्रेलिया संघ आणि नवखा अफगाणिस्तान संघ यांच्यादरम्यान विश्वकप क्रिकेट स्पर्धेत बुधवारी लढत होणार आहे.

पर्थ : चार वेळा जेतेपदाचा मान मिळविणारा अनुभवी आॅस्ट्रेलिया संघ आणि नवखा अफगाणिस्तान संघ यांच्यादरम्यान विश्वकप क्रिकेट स्पर्धेत बुधवारी लढत होणार आहे. युद्धजन्य परिस्थितीत विश्वकप स्पर्धेसाठी पात्रता मिळविणाऱ्या अफगाण संघाची वाटचाल परिकथेप्रमाणे आहे. अफगाणिस्तान संघाने यापूर्वीच्या सामन्यात स्कॉटलंडचा पराभव करीत आपल्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी प्रदान केली. वेगवान गोलंदाजांना अनुकूल वाकाच्या खेळपट्टीचा अफगाणिस्तान संघाला अनुभव नाही. याचा लाभ घेण्यास आॅस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन व मिशेल स्टार्क उत्सुक आहेत. भारताविरुद्ध वाकाच्या खेळपट्टीवर संयुक्त अरब अमिरात संघ १०२ धावांत गारद झाला होता. वाकावर खेळणे आव्हान ठरणार असल्याचे मत अफगाणिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद नबीने व्यक्त केले आहे. नबी म्हणाला, ‘‘सुरक्षेच्या कारणास्तव संयुक्त अरब अमिरात आमच्यासाठी गृहमैदानाप्रमाणे आहे, याची सर्वांना कल्पना आहे. तेथील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल असतात. त्या तुलनेत आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असतात.’’अफगाणिस्तान संघाने विश्वकप स्पर्धेतील एका सामन्यात श्रीलंकेची ४ बाद ५१ अशी अवस्था केली होती. स्कॉटलंडविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज हामिद हसन व शपूर जदरान कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहेत. ९६ धावांची खेळी करणारा समिउल्ला शेनवारी पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास सज्ज आहे.स्कॉटलंडचा पराभव करण्यापूर्वी बांगलादेश व श्रीलंकेविरुद्ध पराभव स्वीकारणारा अफगाणिस्तान संघ बाद फेरी गाठण्याच्या शर्यतीत आहे. आॅस्ट्रेलियाचा पराभव करणे अफगाणिस्तान संघासाठी दिवास्वप्न आहे, पण असे जर घडले, तर वर्तमान क्रिकेटमधील तो सर्वांत मोठा उलटफेर ठरेल. आॅस्ट्रेलियाला या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. पहिल्या लढतीत इंग्लंडचा पराभव करणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाची बांगलादेशविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली. गेल्या लढतीत आॅस्ट्रेलिया संघाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स फिटनेसच्या कारणास्तव या लढतीला मुकणार आहे. त्याच्या स्थानी जोश हेजलवुडला संधी मिळण्याची आशा आहे. (वृत्तसंस्था)हेड टू हेडआॅस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत एकच सामना झाला आहे. हा सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला आहे. आॅस्ट्रेलिया : मायकल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट क्युमिन्स, झेव्हिएर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अ‍ॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), जोश हेजलवुड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हीड वॉर्नर, शेन वॉटसन.अफगाणिस्तान : मोहम्मद नाबी (कर्णधार), अफसार जाजाई (यष्टीरक्षक), आफ्ताब आलम, असघर स्तानिक्झाई, दवलत जद्रान, गुलबादीन नैब, हामिद हसन, जावेद अहमदी, मिरवैस अर्शफ, नाजीबुल्लाह जद्रान, नासीर जमाल, नवरोज मंगल, सॅमिउल्लाह शेनवारी, शपूर जद्रान, उसमान घानी, हशमातुल्लाह शाइदी, इजातुल्लाह दवलतजाई, शाफिकउल्लाह, शराफुद्दीन अशराफ