शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

धोनीला रोखण्याचे आव्हान : रैना

By admin | Updated: February 3, 2016 03:15 IST

आयपीएलच्या नव्या सत्रात महेंद्रसिंह धोनीविरुद्ध खेळणे आणि त्याचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ रोखणे सर्वांत मोठे आव्हान राहणार आहे, असे मत आयपीएलचा नवा संघ गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने व्यक्त केले.

नवी दिल्ली : आयपीएलच्या नव्या सत्रात महेंद्रसिंह धोनीविरुद्ध खेळणे आणि त्याचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ रोखणे सर्वांत मोठे आव्हान राहणार आहे, असे मत आयपीएलचा नवा संघ गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाने व्यक्त केले. रैना व धोनी यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत केवळ चार सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यातील अखेरची लढत २००६ मध्ये खेळली गेली होती. रैना भारतीय संघाव्यतिरिक्त आयपीएलच्या अखेरच्या आठ सत्रांमध्ये चेन्नई सुपरकिंग्समध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेला आहे.आयपीएलमध्ये आतापर्यंत आपल्या फ्रॅन्चायझीतर्फे सर्व सामने खेळणाऱ्या रैनाने त्याच्या संघाचे नाव, लोगो, कर्णधार आणि प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘वेगवेगळ्या संघांकडून कसे खेळणार, याबाबत मी आणि धोनीने आॅस्ट्रेलियात चर्चा केली. ही रोमांचक बाब ठरेल. धोनीला बाद केल्यानंतर जडेजा आनंद साजरा करणार, याची कल्पनाही रोमांचक वाटते. मी धोनीने काही अंतिम सामने सोबत खेळलेले आहेत. धोनीला हेलिकॉप्टर शॉट खेळण्यापासून रोखणे आव्हान ठरणार आहे.’आयपीएलमध्ये सर्वाधिक ३६९९ धावा फटकावणारा रैना म्हणाला, ‘मी आठ वर्षे चेन्नई सुपरकिंग्स संघातर्फे एका महान कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळलेलो असून आता खेळाडू म्हणून परिपक्वता आलेली आहे. आता माझ्यापुढे नवे आव्हान आहे. माझा संघ समतोल आहे.’ राजकोट फ्रॅन्चायझीने आतापर्यंत रैनाव्यतिरिक्त न्यूझीलंडचा ब्रॅन्डन मॅक्युलम, विंडीजचा ड्वेन ब्राव्हो, आॅस्ट्रेलियाचा जेम्स फॉकनर आणि स्थानिक खेळाडू व भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना करारबद्ध केले आहे. (वृत्तसंस्था)आता होणाऱ्या लिलावाबाबत उत्सुकता आहे. आमचे संघव्यस्थापन, प्रशिक्षक त्यात सहभागी होणार असून, आम्ही संयुक्तपणे संघाबाबत विचार करू. भारतात आणि विदेशात प्रतिभावान खेळाडूंची उणीव नाही. आम्ही चांगला संघ तयार करण्यात यशस्वी ठरू, असा मला विश्वास आहे. आता २००८ च्या तुलनेत स्थिती वेगळी असून अनेक युवा खेळाडू छाप सोडण्यास उत्सुक आहेत. आमच्या संघात काही चांगले खेळाडू आहेत. मॅक्युलम व फॉकनर यांच्या समावेशामुळे संघ मजबूत झाला आहे. आगामी चार महिने शिस्तबद्ध जीवन जगावे लागणार आहे. टी-२० साठी जीवनात शिस्त असणे आवश्यक असते. खेळाडूंवर चांगली कामगिरी करण्याचे दडपण असते. मेहनत घेतली तरच यश मिळवता येते.- सुरेश रैना