शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर नेदरलँडचे आव्हान

By admin | Updated: August 11, 2016 00:47 IST

अर्जेंटिनाविरुद्ध शानदार विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला गुरुवारी (दि. ११) आॅलिम्पिकमध्ये जागतिक मानांकनातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँडशी झुंजावे लागणार

रिओ : अर्जेंटिनाविरुद्ध शानदार विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला गुरुवारी (दि. ११) आॅलिम्पिकमध्ये जागतिक मानांकनातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या नेदरलँडशी झुंजावे लागणार आहे. या लढतीत विजय मिळाल्यास स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा प्रवेश निश्चित होईल. आॅलिम्पिकमधील पहिल्या सामन्यात आयर्लंडवर ३-२ असा विजय मिळविल्यानंतर दुसऱ्या लढतीत भारताला विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीकडून १-२ ने मात खावी लागली होती; मात्र यानंतर तिसऱ्या लढतीत टीम इंडियाने जोरदार कमबॅक करताना अर्जेंटिनाला २-१ ने धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघ ब गटातील टॉप चार संघांत कायम आहे. आता साखळी फेरीत जास्तीत जास्त गुण मिळविण्याचे भारताचे लक्ष्य असेल. जेणेकरून टॉप  ८ संघांच्या लढतीत जागतिक क्रमवारीतील नंबर वन आॅस्ट्रेलियाशी सामना टळू शकेल.  दुसरीकडे नेदरलँड संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. आॅलिम्पिकमधील पहिल्या साखळी सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध ३-३ अशी बरोबरी साधल्यानंतर या संघाने आयर्लंडचा ५-० ने धुव्वा उडविला होता, तर त्यानंतरच्या लढतीत कॅनडाला ७-० अशी धूळ चारली होती. यामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या संघाविरुद्ध भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत आम्ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. उर्वरित दोन्हीही सामन्यांत खेळाडू विजय मिळविण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील; मात्र हा मार्ग सोपा नाही. त्यासाठी खेळाडूंना क ठोर मेहनत घ्यावी लागेल. नेदरलँडविरुद्धच्या लढतीसाठी आम्ही रणनीती आखली आहे. या जोरावर नक्कीच भारत विजय मिळवेल, अशी आशा आहे. - श्रीजेश, कर्णधार, भारत१९८४पासून विजयाची प्रतीक्षा आॅलिम्पिकमध्ये भारत आणि नेदरलँड आतापर्यंत ११ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात भारताने ६, तर नेदरलँडने ३ सामने जिंकले, तर २सामने बरोबरीत सुटले होते. भारताने यापूर्वी नेदरलँडला १९८४ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये ५-२ ने नमविले होते.महिला हॉकी : आॅस्ट्रेलियाने भारताला ६-१ने धुतले३६ वर्षानंतर आॅलिम्पिक खेळणाऱ्या भारताच्या महिला हॉकी संघाला आॅस्ट्रेलियाने वेगवान खेळाच्या बळावर ब गटाच्या साखळी सामन्यात ६-१ ने धुतले. भारताचा हा दुसरा पराभव आहे. त्याआधी पहिला सामना भारताने जपानविरुद्ध २-२ असा बरोबरीत राखला. या पराभवामुळे भारताला तीन सामन्यात एकच गुण मिळाला. यामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे.