शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

गेल ‘वादळ’ रोखण्याचे लंकेपुढे आव्हान

By admin | Updated: March 20, 2016 04:10 IST

इंग्लंडवर धडाकेबाज विजयासह आत्मविश्वास दुणावलेला वेस्ट इंडिज संघ आज रविवारी टी-२० विश्वचषकात दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळणार असून सलामीचा आक्रमक फलंदाज

बेंगळुरू : इंग्लंडवर धडाकेबाज विजयासह आत्मविश्वास दुणावलेला वेस्ट इंडिज संघ आज रविवारी टी-२० विश्वचषकात दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळणार असून सलामीचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलकडून पुन्हा एकदा वादळी फटकेबाजीची अपेक्षा असेल.इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजने शानदार खेळ करीत विजय नोंदविला पण लंकेकडून या संघाला कडवे आव्हान मिळू शकते. गेलने ४७ चेंडूत विश्व टी-२० इतिहासात सर्वाधिक जलद शतक ठोकून विंडीजला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात हाच फॉर्म कायम राहिल्यास विंडीजला रोखणे लंकेसाठी कठीण ठरेल. लंकेकडेही अँजेलो मथ्यूज आणि तिलकरत्ने दिलशानसारखे अनुभवी फलंदाज आहेत. विंडीजची फलंदाजी गेलच्या सभोवताल मर्यादित आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ११ षटकार खेचले. त्याला ३७ चेंडूत आठ चौकार ठोकणाऱ्या मर्लोन सॅम्युअल्सची साथ लाभल्याने अष्टपैलू किरोन पोलार्ड, लेंडल सिमन्स, डॅरेन ब्राव्हो या दिग्गजांची संघाला उणीव जाणवली नाही. सुनील नारायण हा फिरकी गोलंदाज नसला तरी सॅम्युल बद्री, सुलेमान बेन आणि सॅम्युअल्स हे प्रभावी फिरकी मारा करू शकतात.दुसरीकडे लंकेला अफगाणवर विजय नोंदविण्यासाठी घाम गाळावा लागला होता.दिलशानच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर लंकेने विजय साजरा केला. ५६ चेंडूत त्याने ८३ धावा केल्या होत्या. या खेळीमुळे आत्मविश्वास संचारला. त्याआधी लंकेला आशिया चषकात तिन्ही पराभवानंतर सराव सामन्यातही सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले होते. दिनेश चांदीमल याच्याकडूनही बऱ्याच आशा आहेत. गुडघेदुखीमुळे लसिथ मलिंगा बाहेर पडल्याने त्याची उणीव जाणवणार आहे. (वृत्तसंस्था)संघ यातून निवडणार वेस्ट इंडिज : डेरेन सॅमी (कर्णधार), सॅम्युअल बद्री, सुलेमान बेन, कार्लोस ब्रेथवेट, ड्वेन ब्राव्हो, जान्सन चार्ल्स, आंद्रे फ्लेचर, क्रिस गेल, जेसन होल्डर, एव्हिन लुईस, अ‍ॅश्ले नर्स, दिनेश रामदीन, आंद्रे रसेल, मर्लोन सॅम्युअल्स आणि जेरोम टेलर.श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दुष्मंता चामीरा, दिनेश चांदीमल, तिलकरत्ने दिलशान, रंगना हेराथ, शेहान जयसूर्या, चामरा कपुगेदारा, नुवान कुलशेखरा, सुरंगा लकमल, तिसारा परेरा, सचित्र सेनानायके, दासुन शनाका, मिलिंदा श्रीवर्धने व लाहिरु थिरिमाने.सामन्याची वेळ सायं. ७.३० स्थळ :चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू