शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

सेलेब्सचा हटके इन्स्टाग्राम डेब्यू!

By admin | Updated: June 9, 2017 02:29 IST

सोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या फेव्हरेट स्टार्सच्या घडामोडींची खबरबात ठेवणे सहज शक्य होते.

- Satish Dongareसोशल मीडियाच्या जमान्यात आपल्या फेव्हरेट स्टार्सच्या घडामोडींची खबरबात ठेवणे सहज शक्य होते. कारण हे सेलिब्रिटी आपल्या सोशल अकाऊंटवरून त्यांच्या आयुष्याशी निगडित बरीचशी माहिती शेअर करीत असतात. विशेषत: इन्स्टाग्रामवर सेलेब्सचा सर्वाधिक बोलबाला असल्याने त्यांची रिल व रिअल लाइफही सहज समजून येते. खरं तर आपल्या फेव्हरेट स्टार्सने इन्स्टावर यावे, अशी त्यांच्या चाहत्यांचीच इच्छा असते. त्यामुळेच बरेचसे स्टार्स चाहत्यांच्या इच्छेखातर इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले आहेत. चित्रपटाप्रमाणेच इन्स्टावरही दमदार डेब्यू करून त्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिली आहे. अशाच काही सेलेब्सच्या इन्स्टा डेब्यूविषयीचा हा वृतांत...अनुष्का शर्मा अभिनेत्री अनुष्का शर्मा ही २०१३ मध्येच इन्स्टावर सक्रिय झाली आहे. इन्स्टा डेब्यू करताना अनुष्काने एक वेगळीच शक्कल लढविली होती. अनुष्काने पहिलाच असा काही फोटो शेअर केला होता, ज्यामुळे तिच्या चाहत्यांच्या मनात ‘पहचान कौन’ असा प्रश्न निर्माण झाला होता. फोटोमध्ये अनुष्काचा चेहरा नव्हे तर केवळ पाय दिसत होते. या पावलाच्या फोटोनेच अनुष्काने इन्स्टाग्रामवर पाऊल ठेवले होते. अभिषेक बच्चनअभिषेक बच्चन याने फेब्रुवारी २०१२ मध्ये इन्स्टाग्रामवर डेब्यू केला होता. अभिषेकचा हा डेब्यू खूपच मजेशीर होता. कारण त्याने फोटोमध्ये स्वत:चा नव्हे तर कृष्णा अभिषेक याचा फोटो अपलोड केला होता. ज्यामुळे अभिषेकचे चाहते गोंधळात पडले होते. नंतर याविषयीचा उलगडा झाला. अमिताभ बच्चनमहानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या सर्वच फॉरमॅटमध्ये प्रचंड सक्रिय आहेत. इन्स्टावरदेखील ते नियमितपणे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. बिग बीने मार्च २०१३ मध्ये इन्स्टा अकाउंटला सुरुवात केली होती. सातपुड्याच्या टेकड्यांवर फिरतानाचा एक फोटो बिग बीने शेअर केला होता. फोटोमध्ये त्यांचे हावभाव एका लहान मुलांप्रमाणे होते. दीपिका पदुकोणबॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही डंका वाजविणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सप्टेंबर २०१३ मध्ये इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली होती. त्यावेळी दीपिकाने एक कोलाज फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘लिमिटेड एडिशन.’परिणिती चोप्राबॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री परिणिती चोप्रा हिने २०१४ मध्ये आपल्या वाढदिवशी म्हणजे २२ आॅक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर सुरुवात केली होती. यावेळी तिने तिच्या मित्र आणि चाहत्यांबरोबर काढलेल्या बऱ्याचशा फोटोंचा एक कोलाज बनवून पोस्ट केला होता. परिणितीचा हा हटके डेब्यू सगळ्यांनाच आवडला होता.