शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अव्वल ५० मध्ये आल्यास उत्सव

By admin | Updated: May 25, 2017 01:11 IST

भारतीय फुटबॉल संघाने फिफा मानांकनाची शंभरी गाठली असली तरी त्याचा उत्सव साजरा करण्याइतपत ही कामगिरी नाही.

सचिन कोरडे। लोकमत न्यूज नेटवर्कगोवा : भारतीय फुटबॉल संघाने फिफा मानांकनाची शंभरी गाठली असली तरी त्याचा उत्सव साजरा करण्याइतपत ही कामगिरी नाही. आपण टॉप-५० मध्ये स्थान मिळवल्यास मोठा उत्सव साजरा करू. भारतीय फुटबॉलमध्येतितकी क्षमता आहे. आपण त्याच दिशेने वाटचालही करीत आहोत. गेल्या २१ वर्षांनंतर आपण मानांकनाची शंभरी गाठली ही बाब समाधानाची आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.गोव्यातील प्रतिष्ठित धेंपो स्पोटर््स क्लबच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त ते गोव्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, फुटबॉल या खेळात आमूलाग्र बदल झाले आहेत. जागतिक स्तरावर स्थान निर्माण करण्यासाठी सर्व साधनसुविधा आवश्यक आहेत. भारतीय फुटबॉल आता नव्याने भरारी घेत आहे. मला विश्वास आहे, की आपण टॉप-५० मध्ये स्थान मिळवू. तोच दिवस खरा उत्सवाचा असेल. विश्वचषकाच्या आयोजनाच्या तयारीबाबत विचारले असता पटेल म्हणाले, स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. फिफाच्या मार्गदर्शन प्रणालीनुसार सर्व बाबी पुरविल्या जात आहेत. देशात पहिल्यांदाच मोठ्या पातळीवरची स्पर्धा होत आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. सर्व राज्य सरकारांचे यासाठी सहकार्य अपेक्षित आहे. या स्पर्धेमुळे भारतातील ‘फुटबॉल फिव्हर’ परत येईल. विश्वचषकाचे गोवा हे एक मुख्य केंद्र असून त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल. गोवा आयोजनात कमी पडणार नाही, याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुरब्बी राजकारणी असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमाच्या भाषणाच्या सुरुवातीलाच पर्रिकरांना टोला मारला. ते म्हणाले, गोवा प्रशासन चालवण्यापेक्षाही अखिल भारतीय फुटबॉल संघटना चालवणे आव्हानात्मक झाले आहे. या खेळात प्रचंड बदल झालेत. खेळातील गुंतवणूक वाढली आहे. साधनसुविधाही गरजेच्या आहेत. या सर्वांची सांगड घालणे सोपे नाही. यावर गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकरांनीही सहमती दर्शवली खरी; मात्र त्यांनीसुद्धा शरद पवार क्रिकेटला आणि पटेल फुटबॉलला प्रगतीपथावर नेत असल्याचा चिमटा काढला.