शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कॅरोलिना पहिल्या फेरीतच बाहेर

By admin | Updated: June 30, 2016 05:53 IST

माजी नंबर वन खेळाडू डेन्मार्कची कॅरोलिना वोज्नियाकीला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

लंडन : जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू डेन्मार्कची कॅरोलिना वोज्नियाकीला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कॅरोलिनाचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले. पुरुषांच्या एकेरीत जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेला गत चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने फ्रान्सच्या अँड्रीयन मॅनारिनोचा ६-४, ६-३, ७-६ असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविचचा हा सलग तिसावा विजय होता.वर्षाभरापासून दुखापतीच्या कारणास्तव खराब फॉर्ममध्ये असलेल्या १४व्या मानांकति कॅरोलिनाला स्वेतलानाने सरळ दोन सेटमध्ये ७-५, ६-४ गुणांनी पराभूत करून घरचा रस्ता दाखविला. पहिल्या सेटमध्ये कॅरोलिनाने चांगली लढत दिली; पण तिला तो सेट गमवावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये कुझनेत्सोव्हा एक वेळ ५-१ गुणांनी आघाडीवर होती. परंतु, नंतर कॅरोलिनाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून बरोबरी साधली. नंतर स्वेतलानाने नेटजवळ काही चांगले प्लेसिंग आणि जोरात फटके मारून गुण संपादन केले. शेवटी दुसरा सेटसुद्धा स्वेतलानाने जिंकला. या पराभवामुळे कॅरोलिनाने गेल्या आठ वर्षांत प्रथमच ५० पेक्षा जास्त होणार आहे. पुरुषांच्या एकेरीत चेक गणराज्याचा टॉमस बर्डीचने क्रोएशियाच्या इव्हान डोडिंगचा चुरशीच्या ३ तास २४ मिनिटे चाललेल्या लढतीत ७-६, ५-७, ६-१, ७-६ गुणांनी पराभव केला. (वृत्तसंस्था)