विश्व बुद्धिबळ स्पर्धा : 1462 दिवसांनंतर आनंदचा कार्लसनवर विजय
सोच्ची : पाच वेळचा जगज्जेता भारताच्या विश्वनाथन आनंदने अखेर मंगळवारी आपली गुणवत्ता सिद्ध केली. विश्व बुद्धिबळ स्पर्धेत त्याने तिस:या डावात नार्वेचा गतविजेता मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. या विजयाबरोबरच त्याने कार्लसनच्या पराभवाचे गुडही उकलले. हा पराभव कार्लसनच्या मात्र जिव्हारी लागलाय आणि त्याच खेळीचे आनंदलाही तेवढेच आश्चर्य आहे.
कार्लसनने केलेली ‘ओपनिंग’ आणि 17 वी चाल त्यालाच कोडय़ात पाडणारी ठरली, असे आनंदने सामन्यानंतर सांगितले. उल्लेखनिय म्हणजे, 1462 दिवसांनंतर आनंदचा कार्लसनवर हा पहिला विजय आहे. याआधी, डिसेंबर 2क्1क् मध्ये आनंदने लंडन चेस क्लासिकमध्ये कार्लसनचा पराभव केला होता.
सामन्यानंतर पत्रकार परिषेदत कार्लसन म्हणाला की, सुरुवातीपासून माङयासोबत चुकीचे घडत गेले. मला स्थिर होण्यासाठी संधीच मिळाली नाही. पण सामना संपलेला नाही. मी माझा सर्वाेत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेल. दुसरकीडे, भारतीय स्टार खेळाडूसाठी तिस:या डावातील
विजय मनोबल उंचावणारा ठरला आहे.
दरमन, पांढ:या मोह:यांनी खेळणा:या भारतीय स्टार विश्वनाथन आनंदने सुरुवातीच्या चालींमध्येच आपला इरादा स्पष्ट केला होता. तो विजयासाठी उतरल्याचे दिसत होते. अखेर 34 व्या चालीत नार्वेच्या कार्लसनला पराभव स्वीकार करावा लागला. आनंदने या विजयानंतर 12 डावांच्या सामन्यात 1.5 आणि 1.5 गुण अशी बरोबरी साधली.