शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'कॅप्टन' कूकने दिला राजीनामा

By admin | Updated: February 6, 2017 19:26 IST

. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने आपल्या पदाचा

ऑनलाइन लोकमत
 लंडन, दि. 6 - कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 अशा तिन्ही प्रकारात झालेल्या दारुण पराभवामुळे पूर्णपणे निराशाजनक ठरलेल्या भारत दौऱ्यानंतर इंग्लंड क्रिकेटला अजून एक मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 
"गेली 5 वर्षे इंग्लंडचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्माननीय होते. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता, पण हा निर्णय माझ्यासाठी आणि इंग्लिश संघासाठी योग्य आहे असे मला वाटते," असे कूकने कप्तानी सोडल्यानंतर सांगितले.  
कूकने 59 कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले होते. डावखुरा फलंदाज म्हणून  संघासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या कूकची कप्तानी कारकीर्द चढ-उतारपूर्ण राहिली. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2013 आणि 2015 साली झालेल्या अॅशेस मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. तसेच दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका आदी संघांनाही कूकच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाने पराभूत केले होते. पण 2013मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅसेस मालिका, तसेच गतवर्षी पाकिस्तान आणि भारताविरुद्घच्या मालिकांमध्ये  इंग्लंडला दारुण पराभव पत्करावा लागला होता.