शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

आक्रमक फलंदाजीस सक्षम; परंतु चातुर्याने खेळतोय : युसूफ

By admin | Updated: May 12, 2015 00:32 IST

आयपीएलमध्ये या वेळेस केकेआरच्या डावाचा सूत्रधार म्हणून भूमिका पार पाडणारा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने, ‘‘मी आक्रमक फलंदाजीसाठी सक्षम आहे;

नवी दिल्ली : आयपीएलमध्ये या वेळेस केकेआरच्या डावाचा सूत्रधार म्हणून भूमिका पार पाडणारा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणने, ‘‘मी आक्रमक फलंदाजीसाठी सक्षम आहे; परंतु संघाच्या हितासाठी शैलीत बदल केला,’’ असे म्हटले आहे.आतापर्यंत ११ सामन्यांत २१६ धावा फटकावणाऱ्या युसूफने आयपीएलच्या या पर्वामध्ये अनेकदा केकेआरसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. गेल्या वर्षी त्याने संघाच्या अंतिम फेरीतील विजयात मुख्य भूमिका बजावली होती; परंतु युसूफ ‘टीम मॅन’च्या भूमिकेत खूष आहे.युसूफ म्हणाला, ‘‘मी जाणीवपूर्वक खेळपट्टीवर टिकून खेळत आहे. मी अजूनही आक्रमक खेळू शकतो; परंतु आता मी समजदारीने खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. संघाच्या विजयात योगदान दिले जावे, यासाठी मी एकेरी-दुहेरी धावा घेऊन डाव पुढे नेत आहे. विजयात जास्त अडथळा येऊ नये, याकडे माझा प्रयत्न असतो. किंग्ज इलेव्हनविरुद्ध ज्या प्रकारे बाद झालो; त्यामुळे दु:खी झालो होतो. जर मी खेळपट्टीवर असतो, तर चांगल्या रीतीने जिंकलो असतो. मी आवश्यकता पडल्यास आक्रमक खेळणार आहे; परंतु परिस्थितीनुसार आपल्या शैलीतही बदल करणार आहे.’’ या नवीन बदलाचा निर्णय आपला स्वत:चा असल्याचे तो म्हणतो.युसूफ म्हणाला, ‘‘शैली बदलण्याचा निर्णय माझा स्वत:चा होता. संघालादेखील माझा नैसर्गिक खेळ न बदलता नवीन शैली अवलंबायला हवी, असे वाटते. मलादेखील आक्रमक खेळून बाद होण्यापेक्षा चांगली फलंदाजी करून सहायकाची भूमिका पार पाडावी, असे वाटले. त्याचा फायदाही मिळत आहे. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. संघाला मुसंडी मारून देण्यासाठी भागीदारी महत्त्वाची आहे.’’या हंगामात आंद्रे रसेलने १९७.९३ च्या स्ट्राईक रेटने तीन अर्धशतकी खेळी केल्या. याविषयी युसूफ म्हणतो, ‘‘मी कधीतरी जी भूमिका बजावत होतो, आता ती भूमिका आंद्रे पार पाडत आहे. संकटप्रसंगी संघ त्याच्यावर अवलंबून असतो, ही चांगली बाब आहे.’’(वृत्तसंस्था)