शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

बट, आसिफ, आमीरच्या पुनरागमनास विरोध

By admin | Updated: August 20, 2015 23:34 IST

स्पॉट फिक्सिंगमधील दोषी सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमीर या पाक क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळात परतण्याची मुभा दिली असली,

कराची : स्पॉट फिक्सिंगमधील दोषी सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमीर या पाक क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खेळात परतण्याची मुभा दिली असली, तरी पाक क्रिकेटविश्वात त्यांना कडाडून विरोध होत आहे. या तिघांना राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान नकोच, अशी भूमिका अनेक माजी खेळाडूंनी घेतली आहे.माजी कर्णधार रशिद लतिफ म्हणाला, ‘मी या तिन्ही खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान देण्याच्या विरोधात आहे. तिघांमुळे प्रतिभावान खेळाडूंच्या यशाचा मार्ग अडविला जाऊ शकतो. सभ्य आणि प्रामाणिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसोबत अन्याय होऊ नये.’ पाकचा माजी सलामीवीर आणि माजी मुख्य निवडकर्ता तसेच कोच मोहसिन खान हादेखील या तिघांच्या पुनरागमनाविरोधात आहे. तो म्हणतो, ‘तिघांनी याबद्दल शिक्षा भोगली असेल; पण त्यांनी मॅचफिक्सिंगसारखा मोठा अपराध केला असून, असा गुन्हा केला असेल तर दुसरी संधी नकोच!’ माजी सलामीवीर बाजिद खान म्हणाला, ‘तिन्ही खेळाडूंनी क्रिकेटला व देशाला धोका दिला आहे. या तिघांची शिक्षा पूर्ण झाली तरी इतरांना संदेश देण्यासाठी या तिघांना संघात स्थान देऊ नये. पाकचा माजी कर्णधार आणि समालोचक रमीझ राजा म्हणाला, ‘या तिन्ही खेळाडूंना पाकच्या ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा प्रवेश देऊ नका.’ माजी कर्णधार आणि सिनियर मॅनेजर मोहम्मद युसूफ याने मात्र बट आणि आमीर यांना पुन्हा संधी देण्याचा युक्तिवाद केला. आपल्या वक्तव्यावर तो म्हणाला, ‘माझ्या मते स्थानिक सामन्यात या खेळाडूंची कामगिरी चांगली राहिल्यास त्यांना राष्ट्रीय संघात प्रवेश द्यावा. मिस्बाह उल हक किंवा अझहर अली यांना या खेळाडूंसोबत खेळण्यास कुठला अडसर असावा असे मला वाटत नाही.’ (वृत्तसंस्था)