शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बटलरचे तुफान, न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावांचे आव्हान

By admin | Updated: June 6, 2017 19:56 IST

सावध सुरुवातीनंतर अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रूट, आणि बटलरच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावा धावांचे आव्हान दिले आहे.

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 6 - सावध सुरुवातीनंतर अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रूट, आणि बटलरच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 311 धावा धावांचे आव्हान दिले आहे. सलमी बल्लेबाज जेसन रॉय झटपट बाद झाल्यानंतर हेल्स आणि रुटने सावध पवित्रा घेत संघाची धावसंख्या हलती ठेवली. हेल्स आणि रुटने दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागिदारी केली. धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात हेल्स 56 धावांवर बाद झाला. हेल्स बाद झाल्यानंतर कर्णधार मॉर्गन मैदानावर आला. पण त्याला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले. मॉर्गन आवघ्या 13 धावांवर बाद. मॉर्गननंतर जम बसलेला रुटही मागारी परतला. रुटने 64 धावांचे योगदान दिले. झटपट गडी बाद होत असल्याने धावसंखेला खिळ बसली होती. यावेळी स्टोक्स आणि बटलरने सामंजस्याने फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. बेन स्टोक्सने 48 धावा करताना बटलरला चांगली साथ दिली. बटलरने तुफानी फटकेबाजी करताना 48 चेंडूत 61 धावांची खेळी केली. बटलर, अ‍ॅलेक्स हेल्स, ज्यो रूट आणि स्टोक्स शिवाय इंग्लंडच्या एकाही खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. हाणामारीच्या षटकात नियमित अंतरावर गडी बाद झाल्यामुळे धावगतीला वेसन बसले. न्यूझीलंडकडून मिल्ने, कोरी अँडरसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. साउदीने दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्ट आणि मिशेल सँटनेरला प्रत्येकी एका बळीवर समाधान मानावे लागले.