शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीवर अपेक्षांचे ओझे : कालुवितरणा

By admin | Updated: August 9, 2015 22:46 IST

भारताचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली विजयासाठी उत्सुक दिसत आहे; पण त्याच्यावर अपेक्षांचे ओझेही आहे, असे मत श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रोमेश कालुवितरणाने व्यक्त केले

कोलंबो : भारताचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली विजयासाठी उत्सुक दिसत आहे; पण त्याच्यावर अपेक्षांचे ओझेही आहे, असे मत श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रोमेश कालुवितरणाने व्यक्त केले. कालुवितरणा म्हणाला,‘भारतात अपेक्षांचे दडपण अधिक असते. भारतात अनेकांना क्रिकेटमध्ये अधिक रुची आहे. कोहली कर्णधारपदाची जबाबदारी कशी निभावतो, याबाबत उत्सुकता आहे. कोहलीला हे अपेक्षांचे ओझे सांभाळावे लागणार आहे. नवा कर्णधार चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असतो व कोहली विजयासाठी भुकेला असल्याचे भासत आहे.’श्रीलंका ‘अ’ संघाचा प्रशिक्षक आणि तीन दिवसीय सराव सामन्यादरम्यान बोर्ड अध्यक्ष एकादशचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्या कालुवितरणाने आगामी तीन कसोटी सामन्यांची मालिका श्रीलंका संघासाठी महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. कालुवितरणा म्हणाला, ‘श्रीलंकेसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. पाकिस्तानविरुद्धच्या यापूर्वीच्या मालिकेत आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पुनरागमन करण्यासाठी आमचा मार्ग आम्हालाच शोधावा लागणार आहे. भविष्यात संघाची वाटचाल कशी राहील हे या मालिकेनंतर निश्चित होईल. याव्यतिरिक्त श्रीलंका संघ दिग्गज फलंदाज संगकाराला मालिका विजयासाठी भेट देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.’ भारताने १२ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या मालिकेपूर्वी एकमेव सराव सामना अनिर्णीत राखला. मालिकेसाठी या सामन्याच्या निकालाला विशेष महत्त्व नसल्याचे कालुवितरणा म्हणाला. भारताने सराव सामन्यात दोन्ही डावांत अनुक्रमे ३५१ व १८० धावा फटकावल्या. भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करताना अध्यक्ष एकादशचा पहिला डाव १२१ धावांत गुंडाळाला. भारतातर्फे अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली तर शिखर धवन, के. एल. राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे फलंदाजही धावा फटकावण्यात यशस्वी ठरले. भारतीय गोलंदाजांमध्ये विशेषत: ईशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली, पण फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, कोहली व रिद्धिमान साहा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पाच गोलंदाजांना संधी देण्याची रणनीती आखली आहे. कालुवितरणा म्हणाला, ‘भारतीय संघ गेल्या काही दिवसांपासून याच रणनीतीने खेळत आहे, त्यामुळे येथेही त्यांनी याच रणनीतीचा वापर केला तर आश्चर्य वाटणार नाही. (वृत्तसंस्था)