शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुमराहचा नो-बॉल भारताला पडला तब्बल 111 धावांना

By admin | Updated: June 18, 2017 22:06 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. 339 धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. अवघ्या 158 धावांमध्ये भारताच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. या महामुकाबल्यामध्ये पाकिस्तानचा नवखा सलामीवीर फखर जमान याने शानदार शतक झळकावलं. अवघ्या 106 चेंडूंमध्ये 114 धावा करत त्याने भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर पाकिस्तानने भारताला 339 धावांचं आव्हान दिलं. 
 
मात्र, या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहची एक चूकीमुळे भारताला तब्बल 111 धावा मोजायला लागल्या. पाकिस्तानच्या फलंदाजीच्या सुरूवातीला भारताकडून जसप्रित बुमराहने टाकलेल्या  चौथ्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला होता. बुमराहच्या या ओव्हरमध्ये फखर जमान हा धोनीकडे झेल देऊन बाद झाला होता. त्यावेळी तो केवळ 3 धावांवर खेळत होता. पण त्याला नशिबाची साथ मिळाली कारण बुमराहचा हा बॉल रिप्ले बघितल्यानंतर नो-बॉल देण्यात आला. त्यानंतरही फखर जमानला धावचीत करण्याची संधी भारतीय क्षेत्ररक्षकांना होती पण भारताचं क्षेत्ररक्षण लौकिकास साजेसं झालं नाही. त्यानंतर फखर जमानने 114 धावांची शानदार खेळी करत भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली.  या शानदार खेळीदरम्यान फखर जमानला नशिबाची जोरदार साथ मिळाली.