शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या शाहूला मिळाला यूथ आॅलिम्पिक कोटा, १० मीटर एअर रायफलमध्ये जिंकले कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:37 IST

मेहुली घोष आणि शाहू माने यांनी जपानच्या वॉको सिटी येथे १० व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकताना २०१८ च्या युवा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय महिला व पुरुष नेमबाज ठरण्याचा बहुमान मिळवला.

नवी दिल्ली : मेहुली घोष आणि शाहू माने यांनी जपानच्या वॉको सिटी येथे १० व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकताना २०१८ च्या युवा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय महिला व पुरुष नेमबाज ठरण्याचा बहुमान मिळवला.मेहुलीने महिला १० मीटर एअर रायफल युवा गटात सुवर्णपदक जिंकतानाच तीन कोटा स्थानांपैकी एक आपल्या नावावर केला, तर कोल्हापूरच्या शाहूने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल युवा गटात कांस्यपदकासह चार कोटा स्थानांपैकी एक प्राप्त केला.भारताने तीन सुवर्ण, तीन कांस्य पदके जिंकली. पहिल्या दिवशी संघाने पाच पदके जिंकली होती. समीक्षा ढिंगार हिने चीनची प्रतिस्पर्ध्याला नमवताना ज्युनिअर महिला १०मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. समीक्षाने २४९.६ गुणांसह रौप्यपदक जिंकणाºया यू झांगला २४ शॉटच्या फायनलमध्ये ०.१ गुणानेमागे टाकले. सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसोने २२७.२ गुणांसह कांस्यपदक जिंकले. भारताची श्रेया सक्सेना १२१.३ गुणांसह आठव्या स्थानावर राहिली.शाहू युवा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला. त्याने २२८.२ गुणांसह कांस्यपदक जिंकले. चीनच्या चांगहोंगे झांग (२५०) याने सुवर्ण, तर बांगलादेशच्या अर्नब शरारने (२४९.५) रौप्यपदक जिंकले. अंतिम फेरीत पात्र ठरणाºया हृदय हजारिकाने १२१.१ गुणांसह आठवे स्थान मिळवले. शाहू, हृदय आणि मोहित अग्निहोत्री यांनी १८६३.१ गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकले. मेहुलीनेही भारतासाठी युवा आॅलिम्पक कोटा मिळवला. मेहुली क्वॉलिफाइंगमध्ये ४२०.६ गुणांसह अव्वल स्थानी राहिली आणि फायनलमध्ये सुरुवातीपासून आघाडीवर राहत तिने सुवर्णपदक जिंकले. मेहुली फायनलमध्ये २५०.५ गुणांसह अव्वल स्थानी राहिली. तिने रौप्यपदक जिंकणाºया चीनच्या मिंगवाई गाओ हिला ०.१ गुणाने मागे टाकले. मेहुलीने रक्षणा चक्रवर्ती आणि श्रेया अग्रवाल यांच्या साथीने एकूण १२४०.५ गुणांसह कांस्यपदक जिंकले. चीनने १२५३.१ गुणांसह सुवर्ण आणि कोरियाने १२४१.२ गुणांसह रौप्यपदक जिंकले. (वृत्तसंस्था)तो गेली दोन वर्षे ज्या जिद्दीने आणि कष्टाने सराव करीत होता त्याची ही यशाची पावती आहे. कोणतेही दडपण न घेतला. त्याने आजची कामिगरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे आम्ही सर्वात खूप आनंदी आहोत. आमच्या वेद रायफल अ‍ॅन्ड पिस्टल शूटिंग अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूचे हे पहिले आंतरराष्टÑीय पदक आहे. शाहूला त्याची सेंट झेव्हियर्स शाळासुद्धा खूप सहकार्य करते. यावर्षी तो १० वी आहे, तरीसुद्धा तो जपानला स्पर्धेसाठी गेला आहे. त्याच्या शाळेतील सर्व शिक्षकसुद्धा त्याचा अभ्यास स्पर्धेनंतर करून घेत असतात, त्यामुळेच त्याने हे मोठे यश संपादन केले. त्याने ज्युनियर गटात भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न जे पाहिले होते ते पूर्ण झाले आहे.- राधिका बराले (छत्रपती पुरस्कारविजेत्या), शाहूच्या मार्गदर्शिकाशाहू गेल्या दोन वर्षांपासून आमच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. नेहमी नवीन काही तरी शिकण्याचा त्यास ध्यास असतो. त्याचसोबत प्रचंड कष्ट आणि जिद्द या जोरावरच त्याने आपल्यामधील क्षमता सिद्ध केल्या आहेत. सकाळी व सायंकाळी दोन टप्प्यांमध्ये तो सराव करीत आहे.- रोहित हवालदार, अ‍ॅकॅडमीचे प्रशिक्षकशाहूची निवड होणे अनपेक्षित होते. त्याच्या निवडीने आम्हाला खूपच आनंद झाला आहे. तो नक्कीच भारतासाठी पदक मिळवून आपल्या देशासह राज्याचे व कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवेल.- तुषार माने, (शाहू मानेचे वडील )

टॅग्स :Sportsक्रीडा