शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूचे कास्यपदक पक्के

By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST

विश्व चॅम्पियनशिप : सायनाचे आव्हान संपुष्टात

विश्व चॅम्पियनशिप : सायनाचे आव्हान संपुष्टात
कोपनहेगेन : भारताची नवीन युवा बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू हिने आज येथे विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत पोहोचताना सलग दुसर्‍यांदा आपले कास्यपदक पक्के केले आहे; परंतु स्टार शटलर सायना नेहवाल हिचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
चीनमध्ये २0१३ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक जिंकणार्‍या १९ वर्षीय सिंधूने पुन्हा एकदा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना चीनच्या ऑल इंग्लंड चॅम्पियन शिझियान वांग हिचे आव्हान १९-२१, २१-१९, २१-१५ असे मोडीत काढले. याच महिन्याच्या सुरुवातीला सिंधूने ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही कास्यपदक जिंकले होते. त्याआधी ऑलिम्पिक कास्यपदक आणि सातव्या मानांकित सायनाला जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू चीनच्या शुएरुई हिच्याकडून अवघ्या ४५ मिनिटांत १५-२१, १५-२१ असे पराभूत व्हावे लागले; परंतु ११ व्या मानांकित सिंधूने पुन्हा आपण भारताचे सवार्ेत्तम बॅडमिंटनपटू आहोत हे सिद्ध केले. तिने चुरशीच्या लढतीत निर्णायक क्षणी धीरोदात्त राहताना वाँगविरुद्ध चौथा विजय मिळवला. सिंधू उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या झू यिंग ताई आणि स्पेनच्या कारोलिन मारिन यांच्यातील विजयी खेळाडूशी दोन हात करील.
एक तास २५ मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधू आणि वांग यांनी एकमेकांच्या चुकांचा फायदा घेताना गुण मिळवले. सुरुवातीला सिंधूने नेटवर वर्चस्व राखले आणि तिने ११-५ अशी आघाडी घेतली. तथापि, वाँगनेही लवकरच स्कोअर १५-१५ असा बरोबरीत केला आणि पुन्हा पहिला गेम जिंकताना १-0 अशी आघाडी घेतली.
पहिलाच गेम गमावल्यानंतर सिंधूने दुसर्‍या गेममध्ये ५-१ अशी आघाडी घेतली; परंतु वांगने लवकरच ६-६ अशी बरोबरी साधली. एक वेळ चिनी खेळाडू ११-९ अशी आघाडीवर होती.
वांगच्या दोन चुकांमुळे सिंधूने दोघांतील अंतर कमी केले. त्यानंतर सिंधूने १६-१६ अशी बरोबरी साधत व वांगने नेटवर केलेल्या चुकांमुळे १९-१६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर चीनच्या खेळाडूने तीन गेम पॉइंट वाचवले; परंतु अखेर सिंधूने महत्त्वपूर्ण गुण मिळवताना सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.