शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
3
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
4
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
5
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
6
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
7
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
8
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
9
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
10
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
11
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
12
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
13
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
14
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
15
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
16
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
18
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
19
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
20
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन

मिश्र टीमची चमकदार कामगिरी

By admin | Updated: February 28, 2017 03:52 IST

दोन निराशाजनक दिवसांनंतर भारतासाठी विश्वकप नेमबाजीमध्ये आजचा दिवस आनंदाचा ठरला

नवी दिल्ली : दोन निराशाजनक दिवसांनंतर भारतासाठी विश्वकप नेमबाजीमध्ये आजचा दिवस आनंदाचा ठरला. अंकुर मित्तलने सोमवारी आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेत मॅरेथॉन डबल ट्रॅप फायनलमध्ये रौप्यपदक पटकावले. त्याआधी जीतू राय व हीना सिद्धू यांनी १० मीटर मिश्र सांघिक एअर पिस्तूल स्पर्धेत जेतेपद पटकावले. २४ वर्षीय मित्तल पोडियममध्ये दुसऱ्या स्थानी राहिला. सुवर्णपदकविजेता आॅस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटच्या तुलनेत तो एका गुणाने पिछाडीवर होता. मित्तलच्या खात्यावर ७४ गुणांची नोंद होती. ग्रेट ब्रिटनच्या स्टीव्हन स्कॉटला ५६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. संग्राम दहिया अव्वल सहामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला; पण फायनलमध्ये त्याला केवळ २४ गुणांची कमाई करता आली. नव्या नियमानुसार ५० शॉटची डबल ट्रॅप स्पर्धा आता ८० शॉटची करण्यात आली आहे. त्यामुळे सहा नेमबाजांच्या फायनलमध्ये ३० शॉटनंतर एलिमिनेशन सुरू होते. १५ वर्षीय शपथ भारद्वाजला सिनियर संघासह पहिल्या विश्वकपमध्ये कटमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले. त्याने १३७ गुणांची नोंद केली. पात्रता फेरीत तो १३२ गुणांसह दहाव्या स्थानी होता. शॉटगन प्रशिक्षक मार्सेलो दाद्री यांनी भारद्वाजची कामगिरी दिवसातील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे म्हटले, तर मित्तलला विलेटच्या साथीने या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम नेमबाज असल्याचे संबोधले. शॉटसर्किटमुळे विद्युतप्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे मिश्र दुहेरीची स्पर्धा एक तास विलंबाने सुरू झाली. त्यात जीतू व हीना यांनी १० मीटर मिश्र सांघिक एअर पिस्तूल स्पर्धेत विजय मिळवला. दरम्यान, मिश्र स्पर्धेचा प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यात पदक देण्यात आले नाही. आयएसएसएफच्या कार्यकारी समितीने या स्पर्धेचा समावेश करण्याची शिफारस मंजूर केली आहे. (वृत्तसंस्था)।अखेरच्या टप्प्यात होते दडपणआशियाई चॅम्पियन मित्तल सुवर्णपदकाच्या शर्यतीत होता; पण अंतिम टप्प्यात सलग तीन शॉट हुकल्यामुळे त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियन नेमबाजाचा अंतिम टप्प्यात केवळ एक नेम चुकला. त्याने अव्वल स्थान पटकावले. मित्तल म्हणाला,‘या नियमानुसार ही पहिलीच स्पर्धा आहे. कामगिरी चांगली झाली. डबल ट्रॅप स्पर्धेला वगळण्याची शक्यता असल्यामुळे वाईट वाटते; पण किमान पुढील वर्षी राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत याचा समावेश राहणार आहे. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. या स्पर्धेचा मिश्र ट्रॅप स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा विशेष यशस्वी ठरल्याचे चित्र नाही. त्यामुळे काय निर्णय होतो, याबाबत उत्सुकता आहे.’मित्तल पुढे म्हणाला, ‘अखेरच्या टप्प्यात माझ्यावर दडपण आले होते. त्यामुळे तीन शॉट हुकले. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे.’या स्पर्धेत ताळमेळ राखणे महत्त्वाचे ठरते. रायने हीनाच्या साथीने जपानच्या युकारी कोनिशी व तोमोयुकी मातसुदा यांचा ५-३ ने पराभव केला. स्लोव्हेनियाच्या नाफास्वान यांगपाईबून व केव्हिन वेंटा यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. राय व हीना उपांत्य फेरीत पिछाडीवर होते; पण त्यांनी त्यानंतर चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदकाच्या शर्यतीत स्थान मिळवले. जागतिक क्रमवारीत माजी नंबर वन हीना स्पर्धेनंतर म्हणाली, ‘आनंद झाला. स्पर्धा रंगतदार होती.’ जीतू म्हणाला, ‘यात ताळमेळ राखणे महत्त्वाचे ठरते. सध्या यात अडचण भासत आहे. एकदा नियम स्पष्ट झाल्यानंतर खेळाडूंसाठी चांगले होईल.’भारताच्या तेजस्विनी सावंतला महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेच्या फायनलमध्ये ४०२.४ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विश्वकपमध्ये मिश्र स्पर्धेला शनिवारी १० मीटर एअर रायफल नेमबाजीपासून प्रारंभ झाला. त्यात चीनने जपानला पिछाडीवर सोडताना सुवर्णपदक पटकावले. अभिनव बिंद्राच्या नेतृत्वाखालील आयएसएसएफ अ‍ॅथलिट समितीने मिश्र स्पर्धेचा समावेश करण्याची शिफारस केली होती आणि विश्व संचालन संस्थेने या प्रस्तावाचा ताबडतोब स्वीकार केला होता.