शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ब्रेक बिल्डर्स चॅम्पियन स्नुकर प्रीमियर लिग

By admin | Updated: July 3, 2016 19:23 IST

शानदार खेळाच्या जोरावर द ब्रेक बिल्डर्स संघाने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. या विजयासह ब्रेक बिल्डर्स संघाने पहिल्या स्नुकर प्रीमीयर लिगमध्ये चॅम्पियन किताबावर नाव कोरले

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ३ : शानदार खेळाच्या जोरावर द ब्रेक बिल्डर्स संघाने रॉयल स्ट्रायकर्स संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. या विजयासह ब्रेक बिल्डर्स संघाने पहिल्या स्नुकर प्रीमीयर लिगमध्ये चॅम्पियन किताबावर नाव कोरले. महाराष्ट्र स्नुकर अ‍ॅन्ड बिलीयर्डस संघटनेने स्नुकर लिगचे आयोजन केले होते. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी चॅम्पियन ब्रेक बिल्डर्स संघाचे अभिनंदन केले. चर्चगेट येथील गरवारे हाऊसमध्ये लिगचे सामने उत्साहात पार पडले. लिगमध्ये दहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात द ब्रेक बिल्डर्स आणि रॉयल स्ट्रायकर्स आमने-सामने आले. बिल्डर्सच्या माजी राष्ट्रीय विजेता मनन चंद्राने सौरव कोठारीचा १५ रेड प्रकारात दोन फ्रेममध्ये ६६-२३, ६६-२१ असा पराभव करत १-० अशी आघाडी घेतली. तर ६ रेड प्रकारात झालेल्या सामन्यात शाहबाज अदिल खानने स्ट्रायकर्सच्यासअलोक कुमारला ३९-२०, ६९-० असे नमवत आघाडी २-०ने भक्कम केली. डबल्समध्ये रिषभ ठक्करने स्पर्श फेरवानीसह खेळण्यास सुरुवात केली. या जोडीने स्ट्रायकर्सच्या सुनील जैन-हसन बदामी जोडीला ७६-३४ अशी मात देत ३-० अशा फरकाची नोंद करत ब्रेक बिल्डर्सने चॅम्पियन किताबाला गवसणी घातली. दरम्यान, उपांत्य फेरीत रॉयल स्ट्रायकर्स संघाने सतरंगी स्क्वॉडला ३-० असे हारवले होते. तर ब्रेक बिल्डर्स संघाने युनायका चॅलेंजरचे तगडे आव्हान ३-२ असे संपुष्टात आणले होते.