शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

मेक्सिकोविरुद्ध ब्राझीलचे पारडे जड

By admin | Updated: June 17, 2014 04:11 IST

विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि यजमान ब्राझील मंगळवारी येथे अ गटातील दुसऱ्या लढतीत मेक्सिकोविरुद्ध आपला स्टार फुटबॉलपटू नेमारच्या बळावर पुन्हा एकदा विजयी मालिका कायम ठेवण्यास आतुर असेल.

साऊ पाउलो : विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि यजमान ब्राझील मंगळवारी येथे अ गटातील दुसऱ्या लढतीत मेक्सिकोविरुद्ध आपला स्टार फुटबॉलपटू नेमारच्या बळावर पुन्हा एकदा विजयी मालिका कायम ठेवण्यास आतुर असेल.ब्राझीलने विश्वचषकाच्या सलामीच्या लढतीत क्रोएशियाविरुद्ध शानदार विजयाने प्रारंभ केला होता आणि घरच्या मैदानावर व प्रेक्षकांच्या साक्षीने त्यांच्यात पुन्हा एकदा विजयासाठी विश्वास दिसून येत आहे. पहिला सामना जिंकून आत्मविश्वास उंचावलेल्या ब्राझीलचे या सामन्यात पारडे जड दिसत आहे, तर मेक्सिकोला सनसनाटी निकालाची अपेक्षा असेल. या दोन संघांत आतापर्यंत ३८ सामने झाले आहेत आणि त्यात २२ वेळेस ब्राझीलने विजय मिळवला आहे, तर १० वेळेस मेक्सिकोनेही विजयाची चव चाखली आहे. सहा सामने ड्रॉ राहिले आहेत. विशेष म्हणजे १९ जून २०१३ ला ब्राझीलच्या फोर्टालेजात दोन्ही प्रतिस्पर्धी संघ आमने-सामने उभे ठाकले होते आणि त्यात ब्राझीलने २-० असा विजय मिळवला होता.ब्राझीलने ४-० असा धडाकेबाज विजय मिळवला होता. गत सप्टेंबर ते आतापर्यंत १० सामन्यांत ब्राझीलने सलग विजय मिळवले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, तसेच एक संघ म्हणूनही त्यांच्या कामगिरीचा ग्राफही चांगला उंचावत आहे. आता ११ व्या विजयासाठी नेमार, आॅस्कर आणि थियागो सिल्वा यांच्याकडूनही त्यांना खूप अपेक्षा आहेत. ब्राझीलच्या आॅस्करने मेक्सिको संघ चांगला असल्याचे म्हटले. तो म्हणाला, ‘‘मेक्सिकोविरुद्ध सामन्याआधी म्हटले, मेक्सिको संघ चांगला आहे आणि त्यांच्याविरुद्ध ब्राझीलला नेहमीच चांगली मेहनत घ्यावी लागली आहे.’’ (वृत्तसंस्था)