बेलो हॉरिझोंटे : घरच्या मैदानावर खेळताना ब्राझीलच विश्वचषकाचा दावेदार असेल, असे स्पध्रेपूर्वी रंगवलेले स्वप्न उपांत्य फेरीत धुळीस मिळाले. स्टार खेळाडू नेयमार आणि कर्णधार टी सिल्वा यांच्या अनुपस्थितीत जर्मनीच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी उतरलेल्या ब्राझीलसाठी मंगळवारची रात्र ‘काळरात्र’ ठरली. एक.. दोन.. नव्हे तर तब्बल सहा गोल्सच्या फरकाने जर्मनीने यजमानांना लोळवून स्टेडियमवर स्मशान शांतता पसरवली. मध्यांतरातच जर्मनीने 5-क् अशी मजबूत आघाडी घेत ब्राझीलला हाफटायमध्ये ‘डेड’ केले. उरलेली औपचारिकता जर्मनीने मध्यांतरानंतर पूर्ण करून सामन्यात 7-1 असा दणदणीत विजय साजरा केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान व जेतेपदाची दावेदारी आणखी मजबूत केली.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनीने ब्राझीलच्या बचावफळीच्या त्रुटी हेरल्या आणि जबरदस्त आक्रमण चढविले. नेयमार आणि सिल्वा यांच्या अनुपस्थितीत ब्राझील मानसिकदृष्टय़ा खचला होता. जर्मनीने लहान-लहान पास देत गोल करून मध्यांतराला 5-क् अशी मजबूत आघाडी घेतली. 23व्या मिनिटाला मिरोस्लाव क्लोसेने गोल करून 2-क् अशी आघाडी घेतली आणि विश्वचषक स्पध्रेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावरही केला. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत टॉनी क्रुसने दोन गोल करून ब्राझीलला हतबल होण्यास भाग पाडले. हा धक्का कमी होता की काय, 29व्या मिनिटाला सॅमी खेडिराच्या गोलने जर्मनीला 5-क् अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर रणनीतीत बदल करून ब्राझीलने त्यांच्या आशा पल्लवित केल्या ख:या. परंतु, जर्मनीचा गोलरक्षक मॅन्युएल नेउएर त्यांचे आक्रमण सहज परतवत होता. 69व्या मिनिटाला अॅण्ड्रे स्कुरल याने अप्रतिम गोल केला. अवघ्या दहा मिनिटांनंतर स्कुरलने गोल करून जर्मनीला 7-क् ने आघाडी मिळवून दिली. ब्राझीलकडून 9क्व्या मिनिटाला ऑस्करने एकमेव गोल केला. (वृत्तसंस्था)
मीडियानेही कान टोचले..
जर्मनीकडून लाजिरवाण्या पराभवानंतर ब्राझील मीडियाने यजमानांचे चांगलेच कान टोचले. हा पराभव केवळ लाजिरवाणाच नसून इतिहासातील लांछनास्पद पराभव असल्याची बोचरी टीका मीडियाने केली.
दैनिक लांसचे विशेषज्ञ मिशोल कास्टेलर म्हणाले, की 195क् साली आमची अशी समज होती की, आमचा संघ अजय आहे आणि माराकाना येथे झालेल्या पराभवानंतर हा समज खोटा ठरला. परंतु या वेळी आम्हाला हे माहीत होते की, आमच्या संघात कमतरता आहे आणि तो अंतिम फेरीत पोहोचू शकत नाही. मात्र ज्या प्रकारे आमचा पराभव झाला, तो लाजिरवाणाच होता.
घरच्या मैदानावर जर्मनीकडून लाजिरवाण्या पराभवानंतर ब्राझीलच्या खेळाडूंमध्ये पसरलेली निराशा स्पष्ट दिसते.
29 मिनिटांत जर्मनीने पाच गोल्स करून विश्वचषकात जलद खेळाची नोंद केली.
1998 सालानंतर ब्राझीलविरुद्ध कुणालाही 5 गोल्स करता आले नव्हते.
1974साली पोलंडने हाफ टाईममध्ये पाच गोल्स केले होते आणि आता जर्मनीही त्यांच्या पंगतीत सहभागी झाले आहे.
221 गोल्स विश्वचषकात जर्मनीच्या नावावर आहेत.
1920नंतर पहिल्यांदा ब्राझीलला कोणत्याही स्पध्रेत सहा गोल्सच्या अंतराने पराभूत केले आहे. त्यासाठी उरुग्वेने 6-क् अशा फरकाने ब्राझीलला नमवले होते.
1975सालानंतर ब्राझीलला घरच्या मैदानावर 64 सामन्यांनंतर पहिला पराभव झाला.
1950साली घरच्या मैदानावर
ब्राझीलला फायनलमध्ये उरुग्वेने पराभूत केले होते.
सोशल मीडिया जॅम!
कोटी 56 लाख टि¦ट्स जर्मनी आणि ब्राझील लढतीदरम्यान पडल्या, हा एक वेगळाच विक्रम आहे. याआधी फेब्रुवारीत सुपर बाऊल सामन्यात 2 कोटी 5क् लाख टि¦ट्स पडले होते.
कोटी पोस्ट, शेअर, कमेंट्स आणि लाइक्स या सामन्याला फेसबुकवर मिळाले. यात सहा कोटी 6क् लाख नवीन चाहत्यांची नोंद होती.
व्या मिनिटात सॅमी खेदिराने केलेल्या गोलवर सर्वाधिक टि¦ट्स झाले. अवघ्या एका मिनिटाच्या कालावधीत 5 लाख 8क् हजार टि¦ट्स पडले.
जर्मन स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोस याने ब्राझीलविरोधात गोल करून विश्वचषक इतिहासात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. त्याने 16व्या गोलची नोंद करीत ब्राझीलच्या रोनाल्डोला (15 गोल) मागे टाकले. 36 वर्षीय क्लोस चौथी विश्वचषक स्पर्धा खेळत आहे आणि त्याने साखळी लढतीत घाना विरुद्ध गोल करून रोनाल्डोच्या 15 गोलशी बरोबरी केली होती. मंगळवारी उपांत्य फेरीत त्याने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला. क्लोसने 2क्क्2 मध्ये सौदी अरबविरुद्ध विश्वचषकातील पहिले चार गोल नोंदविले होते. ती त्याची पहिली विश्वचषक स्पर्धा होती. त्याने त्या स्पध्रेत एकूण पाच गोल करून जर्मनीला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला होता; परंतु त्यांना ब्राझीलकडून 2-क् असा पराभव पत्करावा लागला होता. चार वर्षानंतर त्याच्या झंझावाती खेळाने जर्मनीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि पाच गोल करून क्लोसने ‘गोल्डन बूट’ आपल्या नावावर केला. 2क्1क् मध्ये क्लोसने चार गोल केले होते. पोलंडमध्ये जन्मलेला क्लोस आठ वर्षाचा असताना कुटुंबासह जर्मनीत स्थायिक झाला. त्यानंतर त्याने जर्मनीकडून आतार्पयत 136 आंतरराष्ट्रीय लढतीत 71 गोल केले.