शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

ब्राझीलचे ला ला ला!

By admin | Updated: June 29, 2014 01:51 IST

अद्भुत आणि अवर्णनीय सामन्यात अखेर नेयमारने मारलेल्या विजयी गोलवर ब्राझील थिरकला आणि चिलीचे शूट‘आऊट’ झाले.

नेयमारचा विजयी गोल : ज्युलिओ सेसरचा करिष्मा
बेलो होरिझोंटे :  श्वास रोखून धरायला लावणारी 12क् मिनिटे.. 1-1 अशा बरोबरीनंतर आव्हान टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेली प्रत्येक खेळाडूची झुंज.. आणि त्यानंतर छातीचे ठोके वाढवणारे पेनल्टी शूटआऊट.. अशा अद्भुत आणि अवर्णनीय सामन्यात अखेर नेयमारने मारलेल्या विजयी गोलवर ब्राझील थिरकला आणि चिलीचे शूट‘आऊट’ झाले. या विजयात नेयमारपेक्षा महत्वाची भूमिका बजावली ती गोलकिपर ज्युलिओ सेसर याने. त्याने चिलीचे वार यशस्वीपणो परतवले आणि यजमानांच्या विजयावर 3-2 असे शिक्कामोर्तब केले.
त्याआधी निर्धारित वेळेत उभय संघ 1-1 ने बरोबरीत होते. दोन्ही संघांनी मध्यंतरार्पयत गोल नोंदविले हे विशेष. उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आल्यामुळे 3क् मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. पण त्यातही निकालाची कोंडी फुटू शकली नव्हती. अखेर पेनल्टी शूट आऊटचा सामन्यात अवलंब झाला. ब्राझीलकडून डेव्हिड लुईस, मार्सिलो आणि नेयमार यांनी गोल केले, तर विलियन आणि हल्क यांचा नेम चुकला. 
चिलीकडून चाल्र्स अरांगुईज आणि डियाज यांनीच ज्युलियो सेसरला चकविले. सेसरने चिलीचे खेळाडू मार्सियो पिनिला, अॅलेक्सी सांचेज आणि गोंजालो जारा यांचे शॉट रोखून ब्राझीलच्या चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. 
उत्तरार्धात दोन्ही संघांना अनेकदा गोल नोंदवून आघाडी मिळविण्याची संधी चालून आली.
पण ऐनवेळी वेध चुकल्यामुळे सर्व प्रय}ांवर पाणी फेरले गेले. ब्राझीलकडून हल्क याने  एक गोल नोंदविताच यजमान संघाच्या तंबूत आनंदाला उधाण आले होते. स्वत: खेळाडूंचा मैदानावर जल्लोष सुरू झाला. तथापि रेफ्रीने हा गोल नाकारताच त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. ब्राझीलच्या खेळाडूंनी रेफ्रीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रेफ्रीने कुठलेही नमते न घेता  हल्कला यलो कार्ड दाखविले.
यजमान ब्राझील संघ सुरुवातीला दडपणाखाली दिसला, पण त्यानंतर मात्र त्यांना सूर गवसला.  पाचवेळा जेतेपदाचा मान मिळविणा:या ब्राझील संघाने 18 व्या मिनिटाला शेजारच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध आघाडी मिळविली. लुईजच्या या गोलमध्ये नेयमारची भूमिका महत्त्वाची ठरली. 
26 व्या मिनिटाला नेयमारने एक चांगली चाल रचली, पण त्याला गोलजाळ्याचा वेध घेण्यात अपयश आले. 32 व्या मिनिटाला सांचेजने मिळालेल्या संधीचे सोनं करताना चिली संघाला बरोबरी साधून दिली. (वृत्तसंस्था)
 
04 वेळा ब्राझीलने विश्वचषक इतिहासात पेनल्टी शुटआऊटमध्ये बाजी मारली. याआधी फ्रान्स (1986), इटली (94) आणि हॉलंड (98) यांना ब्राझीलने नमवले.
 
07 वेळा ब्राझील एक्स्ट्रा टाईममध्ये सामना खेळले. यात 1938 साली पोलंडविरुद्धच्या लढतीत त्यांना एक्स्ट्रा टाईममध्ये गोल करण्यात यश आले होते.
 
1934 साली विश्वचषक स्पध्रेत पहिल्यांदा पेनल्टी शुटआऊटमध्ये लढत खेळली गेली होती. फ्रान्सने 3-2 अशा फरकाने ऑस्ट्रीयाला नमवले होते.