वेलिंग्टन: २००८ साली मॅच फिक्स केल्याचा कथित आरोप असलेला कर्णधार ब्रँडन मॅक्युलम याला क्रिकेट न्यूझीलंडने सोमवारी क्लीन चिट दिली. त्याच्याविरुद्ध कुठलाही तपास सुरू नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. मॅक्युलमने चौकशीत संपूर्ण सहकार्य केले. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकापुढे त्याने दिलेल्या साक्षीचे वृत्त ब्रिटिश मीडियाने लीक केल्याबद्दल आम्ही नाराज असल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने वृत्तात पुढे म्हटले आहे. ब्रँडन आयसीसीच्या कुठल्याही चौकशीच्या चौकटीत नाही. त्याच्या साक्षीबद्दल आयसीसीने त्याचे कौतुकच केले. आम्हाला आमच्या कर्णधारावर आणि भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्याने उचललेल्या पावलांवर शंभर टक्के विश्वास आहे. २००८ साली एका मोठ्या माजी क्रिकेटपटूने दोनदा माझ्याशी संपर्क केला होता. पहिल्यांदा कोलकाता येथे आयपीएल सामन्यापूर्वी आणि दुसर्यांदा न्यूझीलंडच्या इंग्लंड दौर्याच्यावेळी हा संपर्क झाला. पण दोन्ही वेळा आपण त्याची मागणी फेटाळून लावल्याची माहिती मॅक्यूलमने चौकशीच्या वेळी दिल्याने ब्रिटनच्या ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने प्रकाशित केले.’(वृत्तसंस्था)
ब्रँडन मॅक्युलमला ‘क्लीन चिट’
By admin | Updated: May 20, 2014 00:45 IST